Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या पाटलांची मंत्रिपदावर वर्णी लागणार?

maharashtra political news : राहुरी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय.... आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे... मात्र भाच्यापाठोपाठ मामाही भाजपमध्ये प्रवेश करणार का? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..
maharashtra political
maharashtra political newsSaam tv
Published On

राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरेंनी भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत. 20 एप्रिलला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका ठरणार असल्याचं तनपुरेंनी स्पष्ट केलंय..

खरं तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदारसंघात अॅक्टिव्ह झाले होते... गळ्यात भगवं उपरणं आणि डोक्यावर भगवी टोपी घालून हिंदूत्ववादी भूमिका तुनपुरेंनी घेतली होती..एवढंच नाही तर सोशल मीडियावरुन तुतारी चिन्हंही हटवलं होतं... तेव्हाच तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.. मात्र त्यानंतर तनपुरेंनी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला... पुढे भाजप नेत्यांच्या मध्यस्थीनं प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली... यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी तनपुरेंना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत साद घातलीय..

maharashtra political
शरद पवार गटाचा दिग्गज नेता 20 तारखेला भाजपमध्ये जाणार? राजकीय समीकरण बदलणार

तनपुरेंनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले खरे...मात्र यामुळे आता त्यांचे मामा जयंत पाटील यांच्याबाबतही जोरदार चर्चा सुरू झालीय. कारण मंत्रिमंडळात जयंत पाटलांसाठी एक जागा रिक्त ठेवण्यात आल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं.. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवारांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद काढण्यासाठी फिल्डिंग लावली...

maharashtra political
प्राजक्त तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, भाजपचं 'ऑपरेशन राहुरी' ग़ंडलं

एवढंच नाही तर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदही सोडलंय. त्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा अधून मधून रंगत असते. आता भाचाला पुढे पाठवून त्यांच्या मागोमाग मामा जयंत पाटीलही भाजपची वाट धरतील का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com