Akola Heatwave : विदर्भ होरपळला! अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी, ऑटोमध्ये आढळला मृतदेह

Akola temperature today : अकोल्यात उष्णतेची लाट तीव्र होत असताना उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
Symptoms And Prevention Of Heat Stroke In Summer
Symptoms And Prevention Of Heat Stroke In SummerSaam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Akola heatwave death latest news : अकोल्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शहरातील मालवाहू ऑटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा अंदाज अकोला पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकतोय अन् नागरिक होरपळून निघत आहे. अकोला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले होते. पुढील काही दिवस अकोल्यात उष्णतेचा इशाराही दिला होता. याच उष्मघातामुळे अकोल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Symptoms And Prevention Of Heat Stroke In Summer
Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल, वाचा २२k, २४k सोन्याचे प्रति तोळा दर

दरम्यान, अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे.. काल अकोल्यातील तापमान जगातील दुसऱ्या क्रमांकावर होतं.. 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यात नोंदविण्यात आलं होतं. विदर्भातील ४ जिल्हे देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामध्ये अकोल्याचे नाव आघाडीवर आहे. ४ दिवसांपासून अकोल्यात सूर्य आग ओकतोय.

Symptoms And Prevention Of Heat Stroke In Summer
मोठी बातमी! कैसे हराया फेम सहर शेखचे नगरसेवक पद जाणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

मागील काही दिवसातील अकोल्यातील तापमान

14 एप्रिल : 44 अंश सेल्सियस.

13 एप्रिल : 43.8 अंश सेल्सियस.

12 एप्रिल : 43.1 अंश सेल्सियस.

11 एप्रिल : 42.1 अंश सेल्सियस.

10 एप्रिल : 40.1 अंश सेल्सियस.

Symptoms And Prevention Of Heat Stroke In Summer
Crime : भीम जयंतीनंतर पप्पूची निर्घृण हत्या, घात लावून चाकूने सपासप वार, २ हत्याने महाराष्ट्र हादरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com