- सचिन बनसाेडे
Shirdi Sai Sansthan News : शिर्डीतील साईमंदिर प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या बैठकीत साईभक्त आणि ग्रामस्थांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. भक्तांना शिफारशीने दिले जाणारे आरती पास (सशुल्क) आता थेट दिले जाणार आहेत. तसेच ग्रामस्थांसाठीही विशेष प्रवेशद्वार सुरू करण्यात येणार आहे. (Breaking Marathi News)
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो भक्त येत असतात. झटपट दर्शन आणि सशुल्क आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकजण गोरखधंदा करत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
सुरक्षा रक्षकांशी असलेले आर्थिक संबधातून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याने आता ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत. शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईमंदिर प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
शिर्डीत आलेले भाविक आपल्याला व्हिआयपी दर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करतात. त्यातूनच काही जणांनी गोरखधंदा सुरू केला आहे. त्यावर नियंत्रण यावे आणि भक्तांची होणारी लूट थांबावी, ज्या ग्रामस्थांना परंपरागत मान आहे त्यांच्यासाठी नियमावली केली जावी अशी मागणी गावक-यांची आहे.
बैठकीमधील निर्णय
- शिर्डी ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून मिळणार दर्शनासाठी प्रवेश.
- ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाही.
- साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी.
- साईभक्तांना आरती पाससाठी शिफारशीची गरज नाही.
- पासकाऊंटरवर मिळणार आरतीसाठीचे पास.
- साई संस्थान कर्मचाऱ्यांना साई भक्तांसोबत सोहार्दपुर्ण वागण्याचे प्रशिक्षण दिले जाणार.
येत्या दहा पंधरा दिवसात बैठकीत निर्णय झालेल्या विषयांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे साईभक्त आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.