
- विनायक वंजारे
Nitesh Rane News : बारसू रिफायनरी प्रकल्पास (barsu refinery) विराेध दर्शविणा-या नागरिकांना येत्या सहा मे राेजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजापूरात जाऊन भेटणार आहेत. ठाकरेंच्या या दाै-यावरुन आज (गुरुवार) आज सिंधुदुर्गात आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी टीकास्त्र साेडले. ते म्हणाले बारसूसाठी नेमका किती रेट कार्ड जाहीर झाला आहे हे उद्धव ठाकरेंनी बारसूत आले की स्पष्ट करावे. महाराष्ट्रातील येणा-या प्रकल्पास विराेध करण्यासाठी हे काेट्यावधी रुपये घेतात असा आराेप राणेंनी आजच्या पत्रकार परिषदेतून ठाकरेंवर केला आहे. (Maharashtra News)
राणे म्हणाले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना बारसुच्या समर्थनार्थ पत्र लिहिलं. माझ्या माहिती प्रमाणे त्या पत्राची किंमत 100 कोटी रुपये होती. काही दिवसांपूर्वी मला एका मोठया उद्योगपतीचा फोन आला. ते म्हणाले उद्धव ठाकरेंकडे रेट कार्ड आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण हवं असेल, व्हिजिट हवी असेल तर एवढे एवढे कोटी. त्यांच्या समवेत आदित्य हवा असेल तर इतके काेटी द्यावे लागतात. महाराष्ट्राच्या विकासाच्या विराेधात हे धंदे करायला निघाले आहेत असा आराेप राणेंनी केला.
राणे पुढं म्हणाले बारसुसाठी रेट कार्ड मधला कुठला आकडा फायनल झाला आहे हे उद्धव ठाकरेंनी बारसुत आल्यावर सांगावं. राज्यातील प्रकल्पाच्या विराेधात काम करायचे झाल्यास इतके इतके द्यावेत असे ठाकरे कंपनी मागते असा आराेप राणेंनी केला. ते म्हणाले राणे साहेबांनी विधिमंडळात सांगितलं होत की जैतापूरसाठी 500 कोटीची डिल झाली. उद्धव ठाकरेंनी हे कधीच नाकारल्याचे अथवा सांगितल्याचे ऐकीवत नाही.
सहा तारखेस बारसुत आम्ही सर्व एकत्र येणार : नितेश राणे
सहा तारखेला बारसुत प्रकल्पाच्या समर्थनार्थ सर्व लोक एकत्र येणार आहोत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमाेद जठार आणि मी व अन्य सर्व एकत्र येणार आहाेत असे नितेश राणेंनी नमूद केले.
आम्हाला ही प्रशासनाने ग्राउंड उपलब्ध करून द्यावं. आम्ही राज्य सरकार,पोलीस प्रशासन यांना विनंती करतो आम्हाला पण 6 तारखेला परवानगी द्यावी. आम्हाला तिथे विकास हवा आहे. याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईचा मराठी माणूस वसई विरारला फेकला गेला असेही राणेंनी म्हटलं.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.