Sharad Pawar, NCP, Supriya Sule, Balasaheb Thorat
Sharad Pawar, NCP, Supriya Sule, Balasaheb Thoratsaam tv

'NCP ने सुप्रियाला देशाचं नेतृत्व दिलं तर आंनदच होईल'; काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची भावना

Rashtrawadi congress party new president : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यक्षदावरुन पाय उतार हाेण्याची इच्छा व्यक्त केली.

- सचिन बनसाेडे

Supriya Sule News : खरं तर काेणाला पक्षाध्यक्ष करावं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. सुप्रियाला (supriya sule) देशाचं नेतृत्व दिलं तर आंनदच होईल अशी भावना काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थाेरात (congress leader balasaeb thorat) यांनी व्यक्त केली. (Maharashtra News)

Sharad Pawar, NCP, Supriya Sule, Balasaheb Thorat
Pramod Jathar On Uddhav Thackeray Barsu Visit : जे स्वत:चे प्रश्न साेडवू शकले नाहीत काेकणी माणसाचे कधी साेडवणार; उद्धव ठाकरेंच्या बारसू दाै-यावर प्रमाेद जठारांची टीका

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पाय उतार हाेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी पवारांनाच अध्यक्ष राहण्याबाबत साकडं घातलं. दरम्यान आज (बुधवार) खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव एनसीपीच्या अध्यक्षपदासाठी पुढं आले आहे. एनसीपी बराेबरच अन्य पक्षातील सुळे या अध्यक्ष झाल्या तर आनंदच हाेईल असे म्हटलं आहे.

Sharad Pawar, NCP, Supriya Sule, Balasaheb Thorat
Rajan Salvi On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंच्या दाै-यावरुन काेकणात घमासान; राजन साळवींचा नारायण राणेंना इशारा

काॅंग्रेस नेते थाेरात म्हणाले सुप्रिया सुळे या जर अध्यक्ष झाल्या तर महाराष्ट्राची लेक देशपातळीवर अध्यक्ष झाली असेच वाटेल. मात्र पवार साहेबांनी पुढच्या काळात राष्ट्रीय पातळीवर प्रवाहात सक्रिय राहील पाहिजे. भाजपचा विरोधक असाच संघटित राहिला पाहिजे एवढीच अपेक्षा असल्याचे बाळासाहेब थाेरात यांनी नमूद केले.

शरद पवार यांची राजकीय निवृत्ती नव्हे

हा प्रश्न अंतर्गत असला तरी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा आहे. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची ही काही राजकीय निवृत्ती नाही. सोनिया व राहुल गांधींना साथ देण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका ठरली आहे. पुरोगामी विचारांची साथ कायम असावी ही आमची अपेक्षा असल्याचे थाेरात यांनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com