- रणजीत माजगावकर
Devendra Fadnavis Visit To Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आल्याच्या रागातून आज (गुरुवार) महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बेळगावतील टिळक चौकात काळे झेंडे दाखविले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे. (Breaking Marathi News)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावत आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात फडणवीस प्रचारासाठी आल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले. महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये अशी घाेषणा करीत फडणवीसांच्या विराेधात कार्यकर्ते यांनी घाेषणा दिल्या.
महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्व मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यामुळे मराठी भाषिक कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच समितीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती.
तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगाव दाखल झाले. फडणवीस येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने टिळक चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभेपर्यंत जाऊ दिले नाही. तसेच अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून माघारी पाठविण्यात आले. तर अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.