'NCP चा वजीर 40 आमदारांसह गायब हाेणार, एका घरात दाेन मुख्यमंत्री हाेणार कसे ?' (पाहा व्हिडिओ)

गेल्या काही दिवसांपुर्वी विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री हाेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती.
ajit pawar, sharad pawar, mahesh shinde, satara news
ajit pawar, sharad pawar, mahesh shinde, satara newssaam tv

Mla Mahesh Shinde News : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) हुशार आहेत म्हणुनच त्यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला, अऩ्था अख्खा राष्ट्रवादी पक्ष (ncp) नामशेष होण्याच्या मार्गावर होता. राष्ट्रवादीचा वजीर (अजित पवार) ४० आमदारांसह बाहेर पडला असता असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी (mla mahesh shinde) नमूद केले. (Maharashtra News)

ajit pawar, sharad pawar, mahesh shinde, satara news
Vinayak Raut On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंच्या बारसू दाै-यात काळी मांजरं आडवी टाकण्याचा भाजपचा प्रयत्न, विनायक राऊतांनी नारायण राणेंना 'झंझावत' ची करुन दिली आठवण

कोरेगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन सोहळा आज (गुरुवार) पार पडला. या वेळी पत्रकारांशी बोलताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विराेधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

ajit pawar, sharad pawar, mahesh shinde, satara news
Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळ निर्णय : कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यात प्रादेशिक मनोरुग्णालय

कोरेगावचे आमदार महेश शिंदे म्हणाले महाविकास आघाडीची वज्रमुठ कधी नव्हतीच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमुठ कधीच गायब केली आहे. आता फक्त त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालला आहे.

राष्ट्रवादी पक्ष हा नामशेष होण्याच्या मार्गावर होता. राष्ट्रवादीचा वजीर (अजित पवार) हा ४० आमदारांना घेवुन बाहेर पडले असते. मात्र शरद पवार हुशार असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे वजीर थांबला आहे. किती ही प्रयत्न केले तरी थोडे दिवसात या गोष्टी होणारच आहेत असा गौप्यस्फोट आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com