Sharad Pawar: लोकांना मोदींची गॅरंटी नाही, निवडणुकीत दाखवून दिलं; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका
Sharad Pawar Slams Pm Modi

Sharad Pawar: लोकांना मोदींची गॅरंटी नाही, निवडणुकीत दाखवून दिलं; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका

Sharad Pawar Slams Pm Modi : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या टीकेचा आणि घोष वाक्यांचा शरद पवारांनी यावेळी समाचार घेतला.

अहमदनगर: पंतप्रधानांनी शपथ घेतली पण त्यांना बहुमत होत का? पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदींना तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं समर्थन घ्यावं लागलं. निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी हे 'मोदी की गॅरंटी' म्हणायचे, पण लोकांना मोदीची गॅरंटी नसल्याचं सिद्ध झालं. अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, आजचा दिवस हा पक्षाचा वर्धापन दिवस आहे. हा आनंद दिवस साजरा करण्यासाठी झालेल्या निवडणुकीत ८ जागा निवडून देऊन या वर्धापनदिनाला साथ दिली. २५ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली. राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहोचवला. तीन महिन्याच्या आत सत्तेच्या राजकारणात काम करण्याची संधी दिली. तेव्हापासून १७-१८ वर्ष राज्य आणि केंद्रात काम करण्याची संधी दिली. यावेळी शरद पवार यांनी मोदींवर सडकून टीका केली.

देशाच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीला आणि देशातील इंडिया आघाडीच्या पारड्यात जनतेने मोठं मताधिक्य दिलं. दुसऱ्या बाजुला मोदी सरकारला जनतेने बहुमतापासून दूर ठेवलं. भाजपला एकट्याच्या मताधिक्यावर सरकार स्थापन करता आली नाही. त्यासाठी भाजपला डीटीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूचं समर्थन घ्यावं लागलं. त्यावरून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी प्रचार सभेत मोदी सरकार, मोदी गॅरंटी असं म्हणत पण त्यांनी कधीच भारत सरकार म्हटलं नसल्याचं पवार म्हणाले.

अल्पसंख्याक समाज हा महत्वाचा घटक असतो

पंतप्रधान हे देशाचे असतात. एका पक्षाचा नसतो. सगळ्या घटकांचा विचार करायला ते विसरले. त्यांनी मुद्दाम केलं. अल्पसंख्याक समाज हा महत्वाचा घटक असतो. या सगळ्या घटकांचा विचार करायला मोदी विसरले. त्यांनी मुद्दाम केले. अल्पसंख्याक समाज हा महत्वाचा घटक असतो. त्यांना विश्वास देण्यात मोदी कमी पडले.

Sharad Pawar: लोकांना मोदींची गॅरंटी नाही, निवडणुकीत दाखवून दिलं; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका
Lok Sabha पराभव, एनडीए, काँग्रेस, कापूस, सोयाबीन; शेती ते राजकारण सगळ्याच विषयांवर अजित पवार दिलखुलास बोलले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com