Sharad Pawar Birthday: जन्म,राजकारण ते संपूर्ण आयुष्य! नाशिककरांनी शरद पवारांसाठी दिलं खास गिफ्ट

Sharad Pawar 83rd Birthday: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उद्या ८३ वा वाढदिवस आहे. शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांकडून अनोखी भेट देण्यात आलीय. देण्यात आलेली ही अनोखी भेट नेमकी कशी आहे, यासंदर्भातील आढावा आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी घेतलाय.
Sharad Pawar 83rd Birthday: Nashik Press Mazdoor Sangh Give Special Gift For Ncp Chief Sharad Pawar On His Birthday
Sharad Pawar 83rd Birthday: Nashik Press Mazdoor Sangh Give Special Gift For Ncp Chief Sharad Pawar On His BirthdaySaam Tv
Published On: 

(अभिजीत सोनवणे)

Nashikkar's Sharad Pawar Birthday:

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांकडून अनोखी भेट देण्यात आलीय. देण्यात आलेली ही अनोखी भेट नेमकी कशी आहे, हे जाणून घेऊ. (Latest News)

Sharad Pawar 83rd Birthday: Nashik Press Mazdoor Sangh Give Special Gift For Ncp Chief Sharad Pawar On His Birthday
Digestion Tips: जेवण पचत नाही? या टीप्स फॉलो करा १० मिनिटात जेवण पचेल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांकडून अनोखी भेट देण्यात आलीय. नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मजदूर संघाकडून शरद पवार यांना ही अनोखी भेट देण्यात आलीय. नोटांच्या सिरीयल नंबरच्या माध्यमातून शरद पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करण्यात आलेत. इंडिया नोट प्रेस मजदूर संघाचे सचिव जगदीश गोडसे यांच्या टीमने ही भेट दिलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar 83rd Birthday: Nashik Press Mazdoor Sangh Give Special Gift For Ncp Chief Sharad Pawar On His Birthday
Chanakya Niti On Success Tips : ऑफिसमध्ये या गोष्टी कराच, कधीच येणार नाही अपयश; टार्गेटही होईल पूर्ण

नाशिकमध्ये शरद पवार मुक्कामी थांबलेल्या हॉटेलमध्ये पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली असून पवारांच्या हस्ते वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आलाय. इंडिया करन्सी नोट प्रेसच्या कामगारांकडून शरद पवारांना ही भेट देण्यात आलीय. नोटांच्या सिरीयल नंबरच्या माध्यमातून मांडला शरद पवार यांचा जीवन प्रवास मांडण्यात आलाय.

शरद पवार यांना देण्यात आलेल्या बॅनरमध्ये शरद पवार यांचा जन्म कधी झाला, ते मुख्यमंत्री कधी झाले, कृषीमंत्री कधी झाले याची माहिती नोटांवरून देण्यात आलीय. शरद पवार यांना मंत्रीपद कोणत्या वर्षी मिळाले त्या वर्षाचा उल्लेख येथे करण्यात आलाय. नोटांच्या सिरीयल नंबरवरून ते साल येथे दर्शवण्यात आले आहेत आणि त्या नोटा या बॅनरवर चिटकवण्यात आल्या आहेत.

Sharad Pawar 83rd Birthday: Nashik Press Mazdoor Sangh Give Special Gift For Ncp Chief Sharad Pawar On His Birthday
Health Tips: हिवाळ्यात १० मिनिटं उन्हात बसा, होतात आश्चर्यकारक फायदे

अशी अनोखी भेटवस्तू देण्याची संकल्पना कशी सुचली हे सांगताना जगदीश गोडसे म्हणाले, ज्यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक इंडिया नोट प्रेसला भेट दिली त्यावेळी त्यांना प्रेसची संपूर्ण माहिती देत असताना शरद पवार यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी मनात संकल्पना आली की, आपण साहेबांच्या आयुष्यावरती काही बायोग्राफी नो शरद पवार थ्रो इंडियन करन्सीतून बनवली पाहिजे. त्याच संकल्पनेतून पवारांची माहिती येथे संकलित केलीय. तसेच पुढील भविष्यात देखील पवार यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती या डिनॉनेशनमधून देऊ आणि ते त्यांना दरवर्षी भेट देऊ, अशी संकल्पना असल्याचं गोडसे म्हणाले.

Sharad Pawar 83rd Birthday: Nashik Press Mazdoor Sangh Give Special Gift For Ncp Chief Sharad Pawar On His Birthday
NCP Crisis: शरद पवारांवर घटनेविरोधी पक्ष चालवल्याचा आरोप, पहाटेच्या शपथविधीवर मोठा गौप्यस्फोट; आजच्या सुनावणीत काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.