Women Felt Down : देव तारी त्याला कोण मारी! कपडे वाळत घालताना सातव्या मजल्यावरुन कोसळली आणि...

Ulhasnagar News : इमारतीच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये कपडे सुखवण्यासाठी गेलेली महिला ग्रिलसोबत सातव्या मजल्यावरून खाली तळमजल्यावर पडल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात घडली. या दुर्घटनेत महिला थोडक्यात बचावली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ulhasnagar women Felt Down
Ulhasnagar women Felt DownSaam Tv
Published On: 

(अजय दुधाणे )

Ulhasnagar women Felt Down From seventh Floor :

तुम्हीही घरातील ग्रीलमध्ये कपडे वाळत घालत असाल, तर काळजी घ्या. कारण कपडे ग्रिलमध्ये वाळत घालत असताना एक थरारक घटना उल्हासनगरमध्ये घडल्यासं वृत्त समोर आलं आहे. उल्हासनगरमध्ये एक महिला कपडे वाळत घालताना खाली पडली. सातव्या मजल्यावर ही महिला आपल्या घरात दुपारी कपडे वाळत घालत होती. (Latest News)

त्यावेळी ग्रिलसोबतच ही महिला खाली कोसळळी. पण सुदैवानं ही महिला अगदी थोडक्यात वाचली. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय यावेळी इमारतीमधील लोकांना आल्याचं आता बोललं जातंय. या महिलेला काहीशी दुखापत झाली असून अगदी थोडक्यात महिलेचा जीव वाचलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ulhasnagar women Felt Down
Virar-Alibaug Multi-Modal Corridor : विरार-अलिबाग अवघ्या २ तासांत, नव्या वर्षात सुरू होणार कॉरिडोरचं काम

नेमकं काय घडलं?

उल्हासनगर शहरात कॅम्प क्रमांक पाच भागात भाटिया रोज आहे. भाटिया रोडवरील महालक्ष्मी टॉवर ही इमारत आहे. या इमारतीतील सातव्या मजल्यावर एक महिला कपडे वाळत घालत होता. दुपारच्या सुमारात ती कपडे वाळत घालत असताना एक अजब प्रकार घडला. कपडे वाळत घालत असताना ग्रिलसोबतच ही महिला थेट खाली कोसळळी. तळमजल्यावरच ही महिला कोसळली गेली. पण यावेळी तळमजल्यावर पत्रे असल्यामुळे ही तेथील पत्र्यांवर आदळली.

यावेळी झालेल्या आवाजानंतर लोकांनी पाहिले असता, त्यांना घडलेला अजब प्रकार लक्षात आला. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला सुखरुप रेस्क्यू केलं. जखीम महिलेचं नाव कोमल तेजवानी असं आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Ulhasnagar women Felt Down
Dombivli Crime News : शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचे ८ वर्षीय मुलीवर अत्याचार; डोंबिवलीतील घटनेने संताप

कोमल तेजवानी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, कोम तेजवानी जिथे राहत होत्या, तेथील इमारत धोकादायक अवस्थेत होती का? ग्रिलसकटच त्या खाली कशा कोसळल्या, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काळजी घ्या!

या घटनेनंतर ग्रिलमध्ये कपडे वाळत घालणाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जातंय. ग्रिलमध्ये उभं राहून जर तुम्ही कपडे वाळत घालत असाल, तर ते जीवावर बेतू शकते. इतकंच काय तर इमारतीच्या ग्रिलमध्ये लहान मुलांना उभं करणंही धोकादायक ठरु शकतं.

Ulhasnagar women Felt Down
Mumbai News: अंडी मासांहारी; विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात अंडी देण्याबाबत फेरविचार करा, धर्मवीर अध्यात्मिक सेनेची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.