Virar-Alibaug Multi-Modal Corridor : विरार-अलिबाग अवघ्या २ तासांत, नव्या वर्षात सुरू होणार कॉरिडोरचं काम

Virar-Alibaug : गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच राहिलेल्या विरार - अलिबाग कॉरिडोरच्या प्रत्यक्ष कामाला नव्या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये सुरुवात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर विरार-अलिबाग हा प्रवास पाच तासांऐवजी अवघ्या दीड किंवा दोन तासांत होऊ शकतो.
Virar-Alibaug Multi-Modal Corridor
Virar-Alibaug Multi-Modal CorridorSaam Tv
Published On

Virar-Alibaug Corridor :

गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच राहिलेल्या विरार - अलिबाग कॉरिडोरच्या प्रत्यक्ष कामाला नव्या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये सुरुवात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर विरार-अलिबाग हा प्रवास पाच तासांऐवजी अवघ्या दीड किंवा दोन तासांत होऊ शकतो.

विरार-अलिबाग कॉरिडोरच्या (Virar-Alibaug Multimodal Corridor) प्रत्यक्ष कामाला नवं वर्ष उजाडणार आहे. २०२४ मध्ये कामाला सुरुवात होईल. एमएमआरच्या या महत्वाच्या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. डिसेंबर अखेरपर्यंत भूसंपादनाचे ८० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन महामंडळाकडे असेल. सध्या पालघार, ठाणे, रायगडमध्ये १२८ किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरसाठीच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे.

पालघरमधील (Palghar) जवळपास ९३ टक्के जमीन संपादीत केलेली आहे. तर रायगड आणि ठाण्यात भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. या कॉरिडोरचे काम २०२४ पर्यंत सुरू होईल.

दोन टप्प्यांत काम होणार पूर्ण

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ९८ किमी तर, दुसऱ्या टप्प्यात २९ किमीचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास नागरिकांचा प्रवास खूप सुखकर होणार आहे.

सरकारने (Maharashtra Government) ११ वर्षांपूर्वी या १२६ किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु काही कारणांनी हे काम रखडले होते. मात्र, आता नव्या वर्षात कॉरिडोरचे काम सुरू होणार आहे. तशी तयारी सरकारने केली आहे.

Virar-Alibaug Multi-Modal Corridor
Navi Mumbai: गणिताचं उत्तर चुकल्याने शिक्षिका संतापली; विद्यार्थिनीला लाकडी बांबूने मारहाण, पोलिसांत गुन्हा

५ तासांचा प्रवास होणार २ तासांत

कॉरिडोरचे बांधकाम पूर्ण झाल्यास विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड- दोन तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. सध्या हा प्रवास ४ ते ५ तासांचा आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्वी एमएमआरडीएकडे होती. मात्र, भूसंपादनाच्या कामाला जास्त वेळ लागल्याने ही जबाबदारी एसएसआरडीसीकडे सोपवण्यात आली आहे.

रिंग रोड

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम पूर्ण झाल्यानंतर सरकार रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. एमएमआरचे सध्या सुरू असल्याचे सर्व प्रकल्प जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत विरार-अलिबाग, शिवडी- न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट, शिवडी-वरळी कनेक्टर, वसई-भाईंदर ब्रिज, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंकसह अनेक प्रोजेक्ट जोडले जाणार आहेत.

Virar-Alibaug Multi-Modal Corridor
Pune Fire News: पुण्यातील कसबा पेठ परिसरातील तीन मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com