Pune Fire News: पुण्यातील कसबा पेठ परिसरातील तीन मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी

Pune Kasba Peth Fire: पुण्यातील कसबा पेठ परिसरातील मोटे मंगकार्यालयाजवळ असलेल्या तीन मजली इमारतीला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली.
fire broke out in Kasba Peth area building of Pune fire brigade reached spot
fire broke out in Kasba Peth area building of Pune fire brigade reached spotSaam TV

Pune Kasba Peth area Building Fire

पुण्यातील कसबा पेठ परिसरातील मोटे मंगकार्यालयाजवळ असलेल्या तीन मजली इमारतीला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच परिसरातील रहिवाशांनी आरडाओरड सुरू केली. काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र, भडका उडाल्याने आग नागरिक घाबरले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

fire broke out in Kasba Peth area building of Pune fire brigade reached spot
Samruddhi Mahamarg: सावधान! समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करताय? VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी

आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने ही इमारत बंदस्थितीत असल्याने तेथे कुणी वास्तव्यास नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मात्र, आगीत इमारतीचं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. शॉर्ट सक्रीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे.

ठाण्यात आगीच्या दोन घटना

ठाण्यात रविवारी दिवसभरात दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. घोडबंदर रोड वरील वाघ बिल मधील गंगोत्री सोसायटी मधील तळ मजल्यावर असलेल्या मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागली होती. सदरचा आगीत 30 मीटर बॉक्स जळाले आहेत.

आगीचे कारण समजू शकलेले नाही. तर या घटनेत परिसरात पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनाचा पुढील टायर जळाला आहे. तर दुसर्‍या घटनेत सिडको रोड येथे एका गाळा येथे किरकोळ आग लागली होती. सदरचा घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

fire broke out in Kasba Peth area building of Pune fire brigade reached spot
Maratha Reservation: मनोज जरांगेंवर चप्पलफेक होऊ शकते; भाजप प्रवक्त्याचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com