Samruddhi Mahamarg Night leopard walking Shocking video viral of Social Media
Samruddhi Mahamarg Night leopard walking Shocking video viral of Social MediaSaam TV

Samruddhi Mahamarg: सावधान! समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करताय? VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Samruddhi mahamarg Leopard Video: आजवर समृद्धी महामार्गावर अपघात होण्याची वेगवेगळी कारणं समोर येत होती. पण, आता वाहनचालकांसमोर एक नवीनच संकट उभं राहिलं आहे.
Published on

Samruddhi mahamarg Leopard Video

विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग नेहमी अपघातांच्या घटनांवरून चर्चेत असतो. महामार्गावरून प्रवास करताना वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा असं, आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं. आजवर महामार्गावर अपघात होण्याची वेगवेगळी कारणं समोर येत होती. पण, आता वाहनचालकांसमोर एक नवीनच संकट उभं राहिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Samruddhi Mahamarg Night leopard walking Shocking video viral of Social Media
Maratha Reservation: मनोज जरांगेंवर चप्पलफेक होऊ शकते; भाजप प्रवक्त्याचा इशारा

त्यामुळे समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) रात्रीचा प्रवास करताना वाहनचालकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून महामार्गावर वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. रविवारी रात्री वाहनचालकांना 'समृद्धी'वर अचानक बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे प्रवासी घाबरून गेले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी मठ पाटीजवळ समृद्धी महामार्गावरील सर्कल गट नं. ६ मध्ये काही वाहनचालकांना रविवारी रात्री बिबट्या दिसून आला. अचानक बिबट्या दिसल्याने वाहनचालक घाबरून गेले.

संभाजीनगर येथील कारचालक राजू पिंपळे यांनी या बिबट्याचा व्हिडीओ (Viral Video) आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. हा बिबट्या पुन्हा समृद्धी महामार्गाच्या दिशेने निघून गेल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पिंपळे यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली.

माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. मात्र, तोपर्यंत हा बिबट्या अंधारात निघून गेला होता. वनविभागाने आजूबाजूला शोध घेतला असता, एका शेतवस्तीवरून ४ शेळ्या गायब असल्याचेही समजले आहे.

कदाचित हा बिबट्या भुकेला असावा किंवा त्याच्या जोडीदाराच्या शोधात असावा, असा कयास धीरेंद्र पवार या शेतकऱ्याने व्यक्त केला. 'समृद्धी'वर वन्यजीवांना वाहनांची वर्दळ लक्षात घेता रस्ता ओलांडणे कठीण होते. दिवसभर याबाबत शहरात चर्चा सुरू होती. वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

 Samruddhi Mahamarg Night leopard walking Shocking video viral of Social Media
Navi Mumbai: गणिताचं उत्तर चुकल्याने शिक्षिका संतापली; विद्यार्थिनीला लाकडी बांबूने मारहाण, पोलिसांत गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com