Maratha Reservation: मनोज जरांगेंवर चप्पलफेक होऊ शकते; भाजप प्रवक्त्याचा इशारा

Vinod Wagh warns Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी दुटप्पी भूमिका घेणे थांबवली पाहिजे, अन्यथा उद्या त्यांच्यावरही चप्पलफेक होऊ शकते, असा इशारा भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांना दिला आहे.
Buldhana news BJP spokesperson Vinod Wagh warns Manoj Jarange Patil about Maratha reservation
Buldhana news BJP spokesperson Vinod Wagh warns Manoj Jarange Patil about Maratha reservationSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही | बुलढाणा ११ डिसेंबर २०२३

Vinod Wagh warns Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील राज्यभरात फिरून जाती-जातीत वाद निर्माण करीत आहेत. आपल्या भाषणातून ते सर्वत्र द्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी दुटप्पी भूमिका घेणे थांबवली पाहिजे, अन्यथा उद्या त्यांच्यावरही चप्पलफेक होऊ शकते, असा इशारा भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांना दिला आहे.

आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आम्ही देखील सहमत आहोत. पण त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन झालं पाहिजे, असंही विनोद वाघ यांनी म्हटलं आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana news BJP spokesperson Vinod Wagh warns Manoj Jarange Patil about Maratha reservation
Article 370: जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळणार? आज ऐतिहासिक फैसला, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीचा निषेधही विनोद वाघ यांनी केला आहे. पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मी निंदा करतो. हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी देखील वाघ यांनी केली आहे.

त्याचबरोबर आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली. मात्र, उद्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर ही चप्पलफेक होऊ शकते, असा इशारा देखील विनोद वाघ यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

जरांगेंना ६ महिन्यांचा तुरुंगवास झाला पाहिजे: सदावर्ते

दरम्यान, मराठा समाजाला (Maratha reservation) सरसकट आरक्षण देणं शक्यच नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास झालाच पाहिजे, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

विचारांची लढाई विचाराने लढायला हवी, मात्र मनोज जरांगे पाटील खालच्या पातळीवर जाऊन मंत्री छगन भुजबळ आणि इतरांवर टीका करत आहे.त्यांच्या सभांमधून ते हुकूमशाहीची भाषा बोलत आहेत. पण बेकायदेशीर आंदोलन करण्याची तरतूद नाही, जरांगेंनी हे लक्षात ठेवावे असेही सदावर्ते म्हणाले आहेत.

Buldhana news BJP spokesperson Vinod Wagh warns Manoj Jarange Patil about Maratha reservation
Akola Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कार आणि बाईकची जोरदार धडक; भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com