BJP NCP Controversy : राष्ट्रवादी अजित पवार गट व सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; रुग्णालयाच्या उद्घाटन फलकावरील नावावरून नाराजी

Dhule News : महापालिका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी फलकावर नाव नसल्याने त्यांनी सत्ताधारी असलेल्या भाजपच्या महापौर प्रतिभा चौधरी यांना जाब विचारला
Dhule Corporation BJP NCP Controversy
Dhule Corporation BJP NCP ControversySaam tv
Published On

धुळे : धुळ्यात महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या उद्घाटन फलकावर सांगितल्यानुसार नाव घेण्यात आले नाही. (Dhule) फलकावरील नावावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) पदाधिकारी, माजी नगरसेवक व सत्ताधारी भाजपच्या महापौर व नगरसेवकांमध्ये वाद झाल्याचे बघावयास मिळाले आहे. (Maharashtra News)

Dhule Corporation BJP NCP Controversy
Manoj Jarange Patil : म्हणूनच ते जेलमध्ये जाऊन आलेत; छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांचा पलटवार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक कैलास चौधरी यांनी सुचवलेल्या महापालिका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी फलकावर नाव नसल्याने त्यांनी सत्ताधारी असलेल्या भाजपच्या महापौर प्रतिभा चौधरी यांना जाब विचारला. (Dhule Corporation) उद्घाटन फलकावर त्यांचं नाव नसल्यावरून उद्घाटनापूर्वीच उद्घाटनस्थळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये व सत्ताधाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे बघायला मिळाले आहे,

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Corporation BJP NCP Controversy
Jalgaon News : विवाहानंतर विदाईच्या वेळेला लग्नमंडपात घडले अघटीत; टाकीत बुडून चिमुरडीचा मृत्यू

कार्यक्रमाचा केला निषेध 
महापालिकेच्या रुग्णालयाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले असून, या वादामध्ये खासदार सुभाष भामरे यांनी मध्यस्थी करत हा वाद निवळण्याचा प्रयत्न केला आहे. माजी नगरसेवक कैलास चौधरी यांना या कार्यक्रमातून डावलण्यात आल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील त्यांना देण्यात आले नसल्यामुळे या कार्यक्रमाचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com