Ajit Pawar Convoy : मोठी बातमी : अमरावतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Ajit Pawar : बळीराजा विदर्भ संघटनेच्या आंदोलकांनी अमरावती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत आंदोलकांना बाजुला करत अजित पवार यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून दिला. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संघटनेकडून लाँग मार्च काढण्यात आला असून मोर्चा नागपूरकडे जात आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Saam Tv
Published On

Ajit Pawar Convoy in Amravati :

बळीराजा विदर्भ संघटनेच्या या आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संघटनेकडून लाँग मार्च काढण्यात आला होता. मोर्चेकरी शेतकरी नागपूरच्या दिशेने जात होते. यावेळी अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा तेथून जात होता. त्यावेळी आंदोलकांनी अजित पवार यांचा ताफा अडवत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. दरमयान पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना बाजूला केलं आणि अजित पवारांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटना आक्रमक झाली आहे. (Latest News)

अधिवेशनावर धडकणार लॉग मार्च

विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने जलसिंचन अनूशेषाच्या नावाखाली १८९४ चा भूसंपादन कायदा असताना देखील अल्प मोबदल्यात खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली. त्यामुळे सरकारने भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला द्यावा यासाठी गुरुवारी शहरातील नेहरू मैदान येथून नागपूर अधिवेशनावर प्रकल्पग्रस्तांचा पायदळ लॉग मार्च निघाला आहे.

सरकारने विदर्भावर सातत्याने अन्यायाचे धोरण राबवत आहे. विदर्भातील प्रकल्पग्रस्त अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने मागील सहा ते तीन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढा सुरू आहे.दरम्यान अनेकवेळा सरकारसोबत चर्चा झाल्या बैठका झाल्या. परंतु प्रत्येकवेळी आश्वासनाशिवाय काही मिळालं नाही. यावेळी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर प्रकल्पग्रस्तांचा लॉन मार्च निघाला आहे.

Ajit Pawar
Maharashtra Politics : नवाब मलिकांवर फडणवीसांची भूमिका, तीच CM शिंदेंचीही; अजित पवार काय भूमिका घेणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com