NCP Crisis: शरद पवारांवर घटनेविरोधी पक्ष चालवल्याचा आरोप, पहाटेच्या शपथविधीवर मोठा गौप्यस्फोट; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: सध्या अजित पवार गटाकडून वकील मुकुल रोहोतगी युक्तीवाद करत आहेत. पक्षांतर्गत निवडणूक न घेता शरद पवार यांनी नेमणूका केल्या आरोपही अजित पवार गटाकडून यावेळी करण्यात आला.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit Pawar saam tv
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. ५ डिसेंबर २०२३

NCP Party And Symbol Hearing:

राष्ट्रवादा कॉंग्रेस पक्ष अन् चिन्हाची लढाई सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद सुरू आहे. शरद पवार गटाचा युक्तीवाद संपला असून सध्या अजित पवार गटाकडून वकील मुकुल रोहोतगी युक्तीवाद करत आहेत. आजच्या सुनावणीत (मंगळवार, ५ डिसेंबर) त्यांनी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल खळबळजनक खुलासे केले आहेत.

पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा...

"२०१९ ला पहाटेच्या शपथविधी वेळी सर्व आमदार हे भाजपासोबत (BJP) जाऊ असं सांगत होते. म्हणुनच अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपा सोबत जावून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी शरद पवार यांची भूमिका वेगळी होती. म्हणजे तेंव्हाही पक्षात सगळ आलबेल होत अस नाही.." असा मोठा युक्तीवाद अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला.

निवडणूक न घेता शरद पवारांच्या नेमणूका..

तसेच पक्षांतर्गत निवडणूक न घेता शरद पवार (Sharad Pawar) यांनी नेमणुका केल्या आरोपही अजित पवार गटाकडून यावेळी करण्यात आला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे असे ३० जुनला सुचविले होते, असेही वकील मुकुल रोहतगी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Ajit Pawar
Manoj Jarange Patil: '२४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण दिलं नाही तर...' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; भुजबळांवरही साधला निशाणा

निवडणूक आयोगाचा अजित पवार गटाला सवाल?

शरद पवार यांची निवड चुकीची आहे तर अजित पवार यांनी त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदाला कस सुचवलं? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड झाली तर त्याची निवडणुक प्रोसिंडींग कुठे आहे ? असा सवाल निवडणूक आयोगाने (Election Commission) यावेळी अजित पवार गटासमोर उपस्थित केला.

संख्याबळ जास्त असल्याचा युक्तीवाद...

दरम्यान, आजच्या सुनावणीत अजित पवार गटाने आमच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे. तसेच १९९९ मध्ये पक्ष स्थापन झाला तेंव्हापासून निवडणूका झाल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या मर्जीच्या लोकांना पदे वाटली. ते पक्ष घटनेच्या विरोधी आहे. याबद्दलचा युक्तीवाद निवडणूक आयोगासमोर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (८ डिसेंबर) ला होणार आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Ajit Pawar
Loksabha Election 2023 : भाजपने लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा लढवाव्यात; निवडणुकीसंदर्भात संस्थांचं सर्वेक्षण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com