Jammu and Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; खोल दरीत कोसळली टॅक्सी, ७ पर्यटकांचा मृत्यू

Accident: जम्मू- काश्मीरमध्ये मोठा अपघात झालाय. येथील गांदरबल जिल्ह्यात श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी खोल दरीत कोसळली. या अपघातात ७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
 Accident
AccidentSaam Tv
Published On

Jammu and Kashmir Accident:

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात झालाय. येथील गांदरबल जिल्ह्यात श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी खोल दरीत कोसळली. या अपघातात ७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. (Latest News)

ही दुर्घटना जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील श्रीनगर-लेह राष्ट्रीय राज्य महामार्गावरील जोजिला दर्रेमध्ये झालीय. इंडिया टिव्हीने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्यानुसार, या अपघातात १ मुलगा गंभीर जखमी झालाय, तर ७ पर्यटकांचा मृत्यू झालाय. जोजिला दर्रेमध्ये झालेल्या अपघातात मृत पावलेले पर्यटक हे केरळमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ते पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टॅक्सी ज्यावेळी दरीत कोसळली त्यावेळी त्यात ८ जण बसले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान घटनास्थळी सोनमार्ग पोलीस दाखल झाले असून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय. जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार, केरळचे पर्यटक टॅक्सीतून सोनमार्ग येथे जात होते. टॅक्सी जोजिला दर्रेवर पोहोचली तेव्हा टॅक्सी रस्त्याच्या कडेला जात दरीत कोसळली.

दरम्यान अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर बाकी जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. मागील महिन्यातही जम्मू-काश्मीरच्या डेडा येथे रस्ते अपघात झाला होता. येथेही पर्यटकांची बस दरीत कोसळली होती. अपघातग्रस्त झालेल्या बसमधून ५५ जण प्रवास करत होते. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला.

 Accident
Cyclone Michaung: मिचौंग चक्रीवादळाने चेन्नईत जनजीवन विस्कळीत; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू , ८ जिल्ह्यांना अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com