Leopard Attack : शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेला, बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

Shahapur Leopard Attack News : शहापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग वेळेत न पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे.
Leopard Attack : शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेला, बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू
Shahapur Leopard Attack NewsSaam Tv
Published On
Summary
  • शहापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • आंबे तोडण्यासाठी गेलेल्या मुलावर अचानक हल्ला

  • वनविभाग वेळेत न पोहोचल्याने संताप

  • गावात भीतीचे वातावरण, सुरक्षिततेवर प्रश्न

  • मानवी-वन्यजीव संघर्ष पुन्हा अधोरेखित

फैय्याज शेख, शहापूर

वर्षभरातील घटना पाहता बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लहान मुले जखमी झाले आहेत. काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. या बिबट्याने अगदी मुंबईच्या वेशीवर येऊनसुद्धा धुमाकूळ घातला. अन्नाच्या शोधात रानावनात भटकणाऱ्या बिबट्यांची मानवी वस्तीत आता मुक्काम ठोकला आहे. अशातच शहापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने मृतदेह जंगलात पडून आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा परिसरात ही घटना घडली. कृष्णा भागवत अगीवले हा ८ वर्षीय मुलगा मित्रांसोबत दररोज आंबे पाडण्यासाठी जात असे. मे महिना असल्याने मुलांना आंब्याचा मोह आवरला नाही. नेहमीप्रमाणे आज देखील तो सकाळची शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत आंबे पाडण्यासाठी गेले होते.

Leopard Attack : शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेला, बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू
Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

आनंदात आंबे गोळा करायला गेलेल्या कृष्णाला आपला काळ समोर उभा असेल याची कल्पनाही नसेल. जंगलात मित्रांसोबत बागडत जाणाऱ्या कृष्णावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला व त्याला जंगलाच्या दिशेने फरफटत घेऊन गेला. ही बाब गावकऱ्यांना माहिती होताच तत्काळ गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र गावकरी पोहोचेपर्यंत बिबट्याने कृष्णाला ठार मारले होते. या घटनेची माहिती पोलिस व वनविभागाचे अधिकारी यांना देण्यात आली.

Leopard Attack : शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेला, बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू
Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ

पोलिसांना माहिती मिळताच कसारा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र वनविभागाचे अधिकारी हे घरीच असल्याने जंगलात मृतदेहचा पंचनामा कोण करणार? यामुळे कृष्णाचा मृतदेह हा अद्यापही जंगलात पडून आहे. कृष्णाच्या मृत्यूने त्याच्या आईने हंबरडा फोडला असून अगीवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leopard Attack : शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेला, बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू
Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

बिबट्यापासून वाचण्यासाठी काय कराल?

  • जंगलात जाताना एकटे न जाता घोळक्याने जा

  • जंगलातून चालताना आवाज करत चाला

  • शक्यतो रात्रीच्या सुमारास जंगलात फिरणं टाळा

  • मुलांना एकटं दाट झाडी, जंगल, शेतात सोडू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com