Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ

Mumbai Mira Bhayandar BJP Leader Rape Case : मिरा-भाईंदरमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ
Mumbai Mira Bhayandar BJP Leader Laxman Jangam Rape CaseSaam Tv
Published On
Summary
  • मिरा-भाईंदरमध्ये नगरसेवकाविरोधात गंभीर गुन्हा नोंद

  • लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप

  • पीडित महिलेची पोलिसांत तक्रार

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

  • प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले

मनोज तांबे, मुंबई

Mumbai Mira Bhayandar BJP Leader Laxman Jangam Rape Case एककीकडे राज्यात भोंदू बाबा, कॉर्पोरेट लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकार उघडकीस येत असताना आता दुसरीकडे मुंबईतून राजकारणाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. मिरा-भाईंदरमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जंगम यांच्या विरोधात पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने राजकारणात खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, जुलै २०२२ मध्ये जंगम यांनी महिलेला त्यांच्या मीरारोड येथील कार्यालयात बोलावून घेतले . त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केल्याचा महिलेने आरोप केला. महिलेने विरोध केला असतानाही कार्यालय, लॉज तसेच इतर ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलिसांत किंवा याबाबत इतर कोणालाही सांगितल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ
Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार, अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

या प्रकरणाला घाबरून महिलेने याबाबत कोणालाही सांगितले नाही. या सर्व प्रकारामुळे पीडित महिला मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर तिने याबाबत पोलीस ठाण्यात जंगम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मिरा रोड पोलिसांनी जंगम यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ
Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आरोपी नगरसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करत असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com