बुलढाण्यात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
लग्न न जुळल्यामुळे नैराश्य असल्याची माहिती
आर्थिक अडचणींमुळे तणाव वाढला होता
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावातील घटना
पोलिसांकडून तपास सुरू
संजय जाधव, बुलढाणा
Buldhana Harish Wankhede Sucide बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे एका तरुणाने टोकाचा निर्णय घेत आपलं जीवन संपवलं आहे. धक्कादायक म्हणजे भूमिहीन व अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या तरुणाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव हरिष अरुण वानखडे (वय २८) असे आहे. हरिष हा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील रहिवाशी आहे. हरिष हा गरीब कुटुंबात लहानचा मोठा झाला. मागील दोन ते तीन वर्षांपासून त्याचे वडील त्याच्या लग्नासाठी प्रयत्न करत होते.
मात्र घरातील परिस्थिती हलाखीची. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला मुलगी देण्यास कोणीही तयार होत नव्हते. यामुळे तो सतत तणावात असायचा. आपलं लग्न होणार नाही या चिंतेने त्याने टोकाचा निर्णय घेतला. घरातील सर्व सदस्य आपल्या कामावर गेल्यानंतर हरिषने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.