Santosh Deshmukh Case
Walmik KaradSaam Tv

Santosh Deshmukh Case: देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराड आणि गँगविरोधात CIDच्या हाती लागला आणखी एक पुरावा

Walmik Karad : बीडच्या विशेष मकोका न्यायालयात उद्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी दुसरी सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी सीआयडीने कराड आणि त्याच्या गँगविरोधात आणखी एक पुरावा न्यायालयात सादर केलाय.
Published on

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने सबळ पुरावे गोळा केली आहेत. ही सर्व पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. उद्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी होणार आहे, याआधी सीआयडीच्या हाती वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगविरोधात आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागलाय. सीआयडीने हे पुरावे न्यायालयाकडे दिली आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगच्या गळ्याभोवती फास अजून जास्त आवळला जाणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल व्हिडिओ, त्याचबरोबर नव्याने तपासामध्ये आढळून आलेल्या काही महत्त्वाचे पुरावे, सीआयडीने बीडच्या न्यायालयाकडे सादर केली आहेत. सीआयडीने देशमुख हत्या प्रकरणी १४०० पानांच्या दोषारोप तयार केले आहे. या हत्या प्रकरणी अजून काही नवीन बाबी समोर आल्या आहेत.

या गोष्टी सीआयडीने न्यायालयात सादर केले आहेत. दोन दिवसांपूर्वी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सुदर्शन घुले आणि त्याच्या गॅंग विरोधात काही सबळ पुरावे न्यायालयात जमा केली आहेत. त्यामुळे आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले याची गॅंग आता चांगलीच अडचणीत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं त्यांची हत्या कशा पद्धतीने करण्यात आली याचा देखील सारांश या पुराव्यांमध्ये देण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case
Jalna Crime : जालना हादरलं; आईच्या प्रियकराकडून दोन चिमुकल्यांवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या ताब्यात

देशमुख हत्या प्रकरणाला चार महिने पूर्ण, अद्यापही कृष्ण आंधळे फरार

कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रशासनाकडे मागणी केलीय. आरोपींना सहकार्य करणाऱ्या बी. टीम वरतीही कारवाई करा. आरोपींना सहकार्य करणाऱ्याला देखील शिक्षा होते हे दाखवून द्या, असं धनंजय देशमुख म्हणालेत. कृष्णा आंधळे फरार असून त्याच्यासंदर्भात तपास काय झाला. आंधळेच्या मागावर कोणती कुठली पथक आहेत, हेदेखील सर्वांना कळणं महत्त्वाचं आहे.

Santosh Deshmukh Case
Solapur Crime: ६८ वर्षीय व्यक्तीचा संतापजनक प्रकार; पैशांचं आमिष दिलं, ३ शाळकरी मुलींना घरात बोलवलं, नंतर...

आंधळेला आधी कैद करणं महत्त्वाचं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची दुसरी सुनावणी उद्या होत आहे या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उज्वल निकम हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे, अशी माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com