Solapur Crime: ६८ वर्षीय व्यक्तीचा संतापजनक प्रकार; पैशांचं आमिष दिलं, ३ शाळकरी मुलींना घरात बोलवलं, नंतर...

Three School Girl molestation: एका वृद्ध व्यक्तीने शाळेत जाणाऱ्या मुलींचा विनयभंग केल्याची घटना सोलापुरातील जेलरोड परिसरात घडलीय. सोलापूर पोलीस ४८ तासात तपास पूर्ण करून आरोपीसह चार्जशीट कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime NewsSaam tv
Published On

विश्वभूषण लिमये, साम प्रतिनिधी

शाळेत जाणाऱ्या तीन मुलींचा ६८ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडलीय. ही घटना सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी जेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, यल्लप्पा कोंचीकोरवे असं ६८ वर्षीय आरोपी व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणात लवकरात लवकर पीडित मुलींना न्याय मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार म्हणालेत.

शाळेत जाणाऱ्या मुलींवर वाईट नजर

या घटनेप्रकरणी सोलापूर पोलीस आयुक्तांनी माहिती दिलीय. ७ एप्रिल रोजी आरोपी यलप्पाने तीन शाळकरी मुलींचा विनयभंग केला. त्याच्या घराच्या समोर असलेल्या शाळेत जाणाऱ्या तीन मुलींना आपल्या जवळ बोलावलं. त्यांना पैशांचे आमिष दाखवत घरात येण्यास सांगितलं. त्या मुली घरात गेल्यानंतर या व्यक्तीने त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केलं. त्यानंतर तिन्ही मुली शाळेत गेल्या त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या मुख्याध्यापकांना सांगितला.

त्यानंतर मुख्यध्यापकांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर अवघ्या ४८ तासात आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात कोर्टात चार्जशीट कोर्टात दाखल केली.

Kolhapur Crime News
Shocking: दबक्या पावलाने आला अन् नको त्या भागाला स्पर्श करून पळाला; मध्यरात्री तरुणींसोबत भयंकर घडलं, घटना CCTVत कैद

खेळणे देण्याच्या बहाण्याने मुलीवर अत्याचार

खेळणे देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर त्याने मुलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून देऊ अशी धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार ठाण्याच्या मुंब्रा परिसरात घडला. राज्यात मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एका वीस वर्षीय तरुणाने खेळणी देण्याचं आमिष दाखवून त्या अल्पवयीन मुलीला घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या मुलगी आरडाओरडा करत असल्याने तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून देण्याची धमकी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com