भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

Gutkha Smuggling Racket Exposed After Car Accident In Sangamner: संगमनेर तालुक्यातील क-हे घाटात झालेल्या भीषण अपघातातून अवैध गुटखा तस्करीचा पर्दाफाश झाला. दरीत कोसळलेल्या कारमधून सुमारे 8 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
Police recover a crashed luxury car from a gorge in Sangamner, uncovering illegal gutkha stock worth lakhs.
Police recover a crashed luxury car from a gorge in Sangamner, uncovering illegal gutkha stock worth lakhs.saam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

संगमनेर तालुक्यातील क-हे घाटात झालेल्या एका भीषण कार अपघाताने अवैध गुटखा वाहतुकीचं मोठं रॅकेट उघडकीस आले आहे. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही “गुटखा किंग” अलिशान कारमधून गुटखा तस्करी करत असल्याचं धक्कादायक वास्तव, या अपघातातून समोर आले. अपघातानंतर कार दरीत कोसळली आणि पोलिसांनी ती वर काढताच कारच्या आत लाखोंचा गुटखासाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे या प्रकरणामागील मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Police recover a crashed luxury car from a gorge in Sangamner, uncovering illegal gutkha stock worth lakhs.
Weather Update: महाराष्ट्रासह २३ राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

क-हे घाटात कारचा अपघात झाल्याची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही युवकांना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दरीत कोसळलेली इनोव्हा कार वर काढली. मात्र कारची तपासणी करताच पोलिसांनाही धक्का बसला. कारण गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचासाठा आढळून आला.

Police recover a crashed luxury car from a gorge in Sangamner, uncovering illegal gutkha stock worth lakhs.
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-शिर्डी एक्स्प्रेस रोज धावणार; थांबे किती आणि फायदे काय?

जवळपास 8 लाख 37 हजार रुपयांचा गुटखा या कारमध्ये आढळून आला. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना आणि FDA ऍक्शन मोडमध्ये असतानाही, अशा पद्धतीने परराज्यातून माल आणून संगमनेरमध्ये विक्री केली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जखमी आरोपींची प्रकृती चिंताजनक असून हा गुटखा नेमका कुठून आला? आणि कुठे नेला जात होता? याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, याआधीही सायखिंडी फाट्याजवळ तालुका पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून लाखोंचा गुटखा जप्त केला होता. त्यामुळे संगमनेर परिसरात अवैध गुटखा रॅकेट सक्रिय असल्याचं समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com