

संतप्त झालेल्या कॅब चालकाने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला.
आरोपी दुर्गाप्रसाद पांडे हा व्यवसायाने ओला कॅब चालक
खडकपाडा पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपीचा शोध लावला.
संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतलाय तेव्हापासून त्यांनी कारावाईच धडाका लावला आहे. भेसळ युक्त पदार्थ विक्रेते असो की गुटखा विक्रेते सर्वांवर तुकाराम मुंढेंनी कारवाई बडगा उगारलाय. मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहे. गुटखा विक्री बंदी घातल्यानं अनेकांना पान टपऱ्या बंद केल्या आहेत. याचाच राग मनात धरत एका कॅब चालकाने थेट आयुक्त तुकाराम मुंढेंना शिवीगाळ केली आहे.
दरम्यान खडकपाडा पोलीस ठाणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ करून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला आहे. या व्यक्तीचे नाव दुर्गाप्रसाद पांडे असे असून तो व्यवसायाने ओला कॅब चालक असल्याचे समोर आले आहे. त्याच्या वडिलांची टपरी होती ती टपरीसुद्धा बंद करण्यात आली. त्याला गुटखा मिळत नसल्याने त्यांनी तुकाराम मुंढेंवर राग काढला.
काही दिवसांपासून गुटखा उपलब्ध होत नसल्याने तो नाराज होता. गुटखा मिळत नसल्याच्या रागातून त्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या प्रकरणाची दखल घेत खडकपाडा पोलिसांनी तपास करून दुर्गाप्रसाद पांडे याचा शोध घेतला आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. दुर्गाप्रसाद पांडे हा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहतो.
खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शने खाली पोलीस निरीक्षक मारुती आंधळे पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने 4 तासात दुर्गाप्रसाद याला शोधून काढला पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA)ने नागपूर आणि पुणे येथे दोन स्वतंत्र कारवायांमध्ये मोठे गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. या कारवाईत नागपूर जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टरकडून विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला सुमारे 1.07 लाख किमतीचा औषधसाठा जप्त केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 22 जून रोजी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोथुळना येथील प्राथमिक सामुदायिक इलेक्ट्रो होमिओपॅथिक उपचार केंद्राची तपासणी करण्यात आली. हे केंद्र बोगस डॉक्टर मोनिदीप सरकार यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.