Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार? अखेर डेडलाईन ठरली, मुंबई-नागपूर प्रवास सुसाट

Samruddhi Mahamarg News Update: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या दोन टप्प्याचं काम यापूर्वीच पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील काम कधी पूर्ण होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Published on

Samruddhi Mahamarg Latest Update:

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या दोन टप्प्याचं काम यापूर्वीच पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील काम कधी पूर्ण होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होण्याची डेडलाईन ठरली असून याबाबत MSRDC ने मोठी अपडेट दिली आहे. (Latest Marathi News)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) अखेरचा १०१ किमीचा टप्पा पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. यापैकी नाशिकमधील भरवीर ते इगतपुरी (Igatpuri) दरम्यानच्या २३ किमी लांबीचा मार्ग फेब्रुवारीतच खुला होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय इगतपुरी ते आमणे हा ७८ किमीचा टप्पा जुलै २०२४ मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. या भागात सध्या १५ पुलांचं कामं सुरू आहे. यामध्ये शहापूर येथील ८४ मीटर उंचीचा आणि १.८ किमी लांबीचा पुलाचा देखील समावेश आहे.

Samruddhi Mahamarg
Manoj Jarnage News: आमचं आंदोलन मुंबईतच होणार, वाहने रोखली तर... जरांगेंचा थेट फडणवीसांना इशारा

दरम्यान, काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. समृद्धी महामार्ग हा राज्याच्या उपराजधानीला राजधानी मुंबईसोबत जोडतो. हा एकूण महामार्ग ७०१ किमीचा आहे.

Samruddhi Mahamarg
Kasara Ghat Fire News: जुना कसारा घाटात धावत्या कारने घेतला पेट; जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची धावपळ

२०२२ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ५२० किमीचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा प्रवासासाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीर या दरम्यानचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरु करण्यात आला. आता तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर प्रवास आणखीच सुसाट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com