Manoj Jarnage News: आमचं आंदोलन मुंबईतच होणार, वाहने रोखली तर... जरांगेंचा थेट फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Latest News: आमचं आंदोलन मुंबईतच होणार असून २० जानेवारी रोजी आम्ही अंतरवाली मधून मुंबईकडे रवाना होणार आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
Manoj JArange-Devendra FAdnavis
Manoj JArange-Devendra FAdnavisSaam TV
Published On

Manoj Jarange on Maratha reservation

राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. २० जानेवारीला अंतरवाली सराटी येथून जरांगे मराठा आंदोलकांसोबत मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत येणार असल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj JArange-Devendra FAdnavis
Maratha Reservation: मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, CM शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक; नेमकं काय घडतंय?

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ट्रॅक्टरमालक शेतकऱ्यांना नोटीसा धाडल्या असून कुणीही मुंबईत ट्रॅक्टर घेऊन येऊ नये, अन्यथा ट्रॅक्टर जप्त केलं जाईल, असा इशाराच दिला आहे. यापार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत खडेबोल सुनावले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून माध्यमांसोबत संवाद साधला. आमचं आंदोलन मुंबईतच होणार असून २० जानेवारी रोजी आम्ही अंतरवाली मधून मुंबईकडे रवाना होणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. मुंबईतील सगळी मैदानं आम्हाला लागतील, सरकारने त्यासाठी तयारी करावी, असं आवाहनही जरांगे यांनी केलं. (Latest Marathi News)

आमच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असंही जरांगे यांनी ठामपणे सांगितलं. आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो, आणि आमची वाहने अडवण्याचा प्रयत्न झाला, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर, मुंबईतील घरात जाऊन बसू, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

आमची वाहने सरकारने रोखली तर आम्ही सर्व सामान कशात घेऊन जाणार? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. दरम्यान, २० तारखेला ओबीसी समाज देखील राज्यभरात आंदोलन करणार असल्याचं बोललं जातंय. याबाबत जरांगे यांना प्रश्न विचारला असता, मला त्यांचं काही माहिती नाही, असं उत्तर जरांगे यांनी दिलं.

Manoj JArange-Devendra FAdnavis
World Richest Women: जगातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईत अदानी-अंबानींना टाकलं मागे; एकूण संपत्ती किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com