Republic day 2025 : प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार? मंत्र्यांची यादी आली समोर, वाचा

Republic day Flag Unfurling : २६ जानेवारी २०२५ रोजी राज्यभरात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात एकाच वेळी ९.१५ वाजता ध्वजवंदन कार्यक्रम सुरु होईल.
Republic day Flag Unfurling
Republic day Flag Unfurling Saam Tv
Published On

Republic day News : २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ पार पाडला जाणार आहे. राज्यभरात एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यामुळे सकाळी ८.३० ते १० या दरम्यान अन्य कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित केला जाऊ नये असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

मुंबईतील मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन होईल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. तर विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री तसेच राज्यमंत्री ध्वजवंदन करतील.

राष्टध्वजवंदन करणारे मंत्री, राज्यमंत्री यांची यादी

ठाणे - उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

पुणे - उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार

नागपूर - मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

अहिल्यानगर - राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील

बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे

रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे

वाशिम - हसन सकीना मियालाल मुश्रीफ

सांगली - चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन

पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड

मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा

मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार

Republic day Flag Unfurling
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा सातवा हप्ता खात्यात कधी जमा होणार? अजित पवारांनी तारीखच सांगून टाकली

रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत

धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे

चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके

सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई

लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे

Republic day Flag Unfurling
Aaditi Tatkare: मी पालकमंत्री असले तरी भरत शेठदेखील...; गोगावलेंचं पालकमंत्रिपद हुकल्यावरून आदिती तटकरेंचं मोठं विधान

हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ

भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे

छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट

धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे

अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर

गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल

वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर

परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे - बोर्डीकर

अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक

Republic day Flag Unfurling
Bharat Gogawale VS Aditi Tatkare : रायगडचं पालकत्व तटकरेंकडे, शिवसेनेत नाराजी, ३८ पदाधिकार्‍यांचा राजीनामा, शिंदेंसमोर पेच वाढला

ध्वजवंदन करणारे मंत्री, राज्यमंत्री अनुपस्थित असल्यास विभागीय मुख्यालयातील आयुक्त, जिल्हाधिकारी ध्वजवंदन करतील. प्रांत अधिकारी जिल्हा उपविभागीय तर तहसीलदार तालुका मुख्यालयी ध्वजवंदन समारंभाच्या ठिकाणी अध्यक्षपद स्विकारतील. प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारती, किल्ले, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावेत असेही राजशिष्टाचार विभागाने कळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com