Aaditi Tatkare: मी पालकमंत्री असले तरी भरत शेठदेखील...; गोगावलेंचं पालकमंत्रिपद हुकल्यावरून आदिती तटकरेंचं मोठं विधान

Aditi Tatkare On Bharat Gogavale: आदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिदावरून विधान केलंय. प्रत्येत पक्षात नाराजी असणं स्वाभाविक असल्याचं विधान आदिती तटकरे यांनी केलंय.
Aditi Tatkare
Aditi Tatkare On Bharat gogawale mmcn
Published On

महायुतीतील पालकमंत्रिपदाचा तिढा शुक्रवारी सुटला असून त्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. मात्र पालकमंत्रिपदावरून रायगडमधील राजकारण तापलंय. जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले आहेत . महायुतीमध्ये रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. पण त्यामुळे शिवसेनेत नाराजीचा सूर उमटलाय. भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळालं नसल्यानं नाराज शिवसैनिकांनी राजीनामा दिलाय. त्याचवेळी आदिती तटकरे यांनी भरतशेठ यांच्याबाबत महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं विधान केलंय.

महायुतीच्या कोणत्याच सहकाऱ्याने नाराज होण्याचं कारण नाही . पालकमंत्रिपदाची जबाबदारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी दिलीय. रायगड जिल्हाचं पालकमंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे असली तर भरतशेठ गोगावले हे माझे सहकारी आहेत. ते मंत्री असल्याने व्यवस्थित समतोल राखून एकमेकांना सहकार्य करू. जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी आम्ही कार्य करू. कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी राहणे स्वाभाविक असते.

Aditi Tatkare
Dhananjay Munde: 'मैं आईना हुं आईना दिखाऊंगा', अजित दादांसमोर धनंजय मुंडे फडाफडा बोलले..

कारण प्रत्येत पक्षाची इच्छा असते की, त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी. पण महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आलीय, ती जबाबदारी मी योग्य पद्धतीने आपली प्रगती करायची असते. त्या म्हणाल्या. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे भरत गोगोवाले इच्छूक होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. पण यंदाही त्यांना पालकमंत्रिपदापासून दूर राहावं लागलंय.

यामुळे पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. रायगडमधील काही शिवसैनिकांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे शिंदेंसमोर नवा पेच निर्माण झालाय.

Aditi Tatkare
Dhananjay Munde: पालमंत्रिपदावरून हटवल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'अजितदादांना...'

दरम्यान भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झालेत. जिल्ह्यातील ३८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहे. रायगडमधील शिवसेनेच्या विविध ३८ पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री व सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलाय. रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला दिल्याने निषेध व्यक्त केला. भरत गोगावले यांना डावलल्याने रायगड शिवसेनेत मोठी नाराजी आहे. त्याचेच पडसाद पडताना दिसत आहे.

गोगावले समर्थकांनी नाराजी व्यक्त करत मात्र आंदोलन पुकारले होते. शनिवारी रात्री काही काळासाठी महामार्गही रोखला होता. शिवाय पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे भरत गोगावले यांनाही नाराजी व्यक्त केलीय. पालकमंत्रिपदावरील निर्णय धक्कादायक आहे, ही अपेक्षा नव्हती, अशी नाराजी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com