
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून अख्खं महाराष्ट्र पेटून उठलंय. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी एकत्रित येत वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांना टार्गेट केलंय. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला कोडींत पकडलं. वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे आहेत. वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडे करत आहेत, असे अनेक आरोप धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी केले. यावर 'मैं आईना हुं आईना दिखाऊंगा' असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांना सूचक इशारा दिलाय.
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांना सूचक इशारा दिला आहे. 'मैं आईना हुं आईना दिखाऊंगा' अशा शब्दात त्यांनी सूचक इशारा दिलाय. तसेच राजीनामाच्या मागणीवरून आणि आरोपांबाबात बोलताना मुंडे यांनी अनेक मुद्दे मांडले.
'मला काही लोक टार्गेट करीत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी आता अजित दादांकडे आहे. फक्त बीड नाही तर, अख्ख्या मराठवाड्यातील सामाजिक सलोखा बिघडला आहे. बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. ज्यांनी हे केलं त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले. बीडचा बिहार झालाय असं म्हणतात, पण कुणी केला? १२ ज्योतिर्लिंगेपैकी १ परळीत आहे. याला बदनाम करू नका', असंही धनंजय मुंडे म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल धनंजय मुंडे म्हणाले..
'लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. पहिली परिक्षा ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये कमी पडणार नाही. पक्षाने ताकद दिली आहे. दादांना मी शब्द देतो. मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. उद्या मला पाँडेचेरीची जबाबदारी दिली, तरी मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन', असं धनंजय मुंडे म्हणाले.
पहाटेचा शपथविधी षडयंत्र
'पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की, तुम्ही जाऊ नका. हे षडयंत्र आहे. पण दादा म्हणाले काही होत नाही. सुनील तटकरे या गोष्टीला साक्षीदार आहेत. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं.' असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.