EPFO PF transfer: EPFO कडून PF खातेदारांसाठी गुडन्यूज! आता PF ट्रान्सफर करणं झालं सोपं, मिळतील अनेक फायदे

Online provident fund transfer: ईपीएफओनं खातेदारांसाठी एक दिलासादायक अपडेट जारी केलंय. ऑनलाईन ट्रान्सफर क्लेम अधिक सुलभ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं काही सुधारणा केले आहेत.
EPFO
EPFO Saam Tv
Published On

ईपीएफओनं खातेदारांसाठी एक दिलासादायक अपडेट जारी केलंय. ऑनलाईन ट्रान्सफर क्लेम अधिक सुलभ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं काही सुधारणा केले आहेत. या सुधारीत बदलांमुळे पीएफ ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. तसेच ट्रान्सफर करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची देखील बचत होणार आहे. ईपीएफओने केलेल्या बदलांमुळे नोकरी बदलणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हे काम आधार आणि काही कागदपत्रांच्या मदतीने पूर्ण करता येईल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अनेकदा आपले नियम बदलत राहते. जेणेकरून सदस्यांना मोठा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत, ईपीएफओने काही ट्रान्सफर नियमांमध्ये बदल केले आहेत. आता खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी त्यांचे ईपीएफ अकांऊट सहज पद्धतीने ट्रान्सफर करू शकतात. ईपीएफओनं नोकरी बदलल्यावर प्रॉव्हिडेंट फंडच्या ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया खूप सोपी केलीय. आता जुन्या किंवा नव्या एम्प्लॉयरची मंजूरी न घेता प्रॉव्हिडंट फंड ट्रान्सफर करता येऊ शकते.

EPFO
Cyber crime news: पुण्यात सायबर फ्रॉडचा सुळसुळाट! पोलिसांनी नेपाळी गँगचा 'असा' केला पर्दाफाश

कर्मचाऱ्यांना कोणते फायदे मिळतील?

ईपीएफओने १५ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भातली एक पत्रक जारी केले आहे. नोकरी सोडल्यानंतर पीएफ ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आलीय. आता ज्या कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबर २०१७ नंतर यूएएन क्रमांक जारी करण्यात आले आहेत आणि ते आधार लिंक्ड आहेत. त्यांना त्यांच्या मेंबर आयडीवर प्रॉव्हिडंट फंडची रक्कम ट्रान्सफर करता येईल.

EPFO
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना दणका! बडा नेता गळाला लागला, इनकमिंग सुरूच

तसेच एकाच यूएएन क्रमांकावर असलेल्या अनेक मेंबर आयडीमध्ये प्रॉव्हिडंट फंड ट्रान्सफर केले जाऊ शकते. परंतू त्यासाठी १ ऑक्टोबर २०१७ नंतर एकाच यूएएन क्रमांकावर पूर्वीची माहिती योग्यरित्या नोंदवलेली असणे आवश्यक आहे. यामध्ये यूएएन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक असणं गरजेचं आहे.

जर २ यूएएन क्रमांक असलेल्या मेंबर आयडीमधून प्रॉव्हिडंट फंड ट्रान्सफर करायचा असेल, तर त्यामध्ये १ यूएएन क्रमांक १ ऑक्टोबर २०१७ पूर्वी दिला गेलेला असावा. तसेच किमान १ यूएएन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. याशिवाय खातेदाराचे नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती योग्य असणे आवश्यक आहे. या बदलांमुळे खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com