Raj Thackeray : २०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, राज ठाकरेंची कोपरखळी

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या मिश्किल वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. यावेळी आशिष शेलार यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवर टिप्पणी केली.
Raj Thackeray'
Raj Thackeray'
Published On: 

प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या मराठी व्यंगचित्रकारांच्या इतिहासावरील विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी नेहमीच्या दिलखुलास शैलीत मिश्किल टिप्पणी केली. शेलार यांना उत्तर देताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली. ते म्हणाले की, यापुढे पण मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन आणि ते येत जातील. २९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. राज ठाकरेंच्या या कोपरखळीवर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी भाषण करताना फडणवीस यांना कोपरखळी मारली. दरम्यान, राज ठाकरेंच्या आधी बोलताना शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला मारला होता. उद्धवजी, तुम्ही समजून घ्या, राज ठाकरे बोलले की मुख्यमंत्री येतात. यावर राज ठाकरेंनी उत्तर दिले.

काय म्हणाले राज ठाकरे?

कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीच्या दिलखुलास शैलीत उपस्थितांचे लक्ष वेधले. व्यासपीठावर कोण-कोण उपस्थित आहे यावर भाष्य करताना त्यांनी मिश्किलपणे म्हटले की, "व्यासपीठावर कोण कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे. यापुढे पण मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईल आणि ते येत जातील. २०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं."

Raj Thackeray'
Viral Love Story : प्रेमाला उपमा नाही... प्रेयसी ७ वर्षे कोमात, प्रियकरानं साता जन्मासारखी वाट बघितली; शुद्धीवर येताच आयुष्यभराची गाठ बांधली

राज ठाकरेंच्या तोंडून हे वाक्य येताच संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. देवेंद्र फडणवीस यांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्याबाबत त्यांनी केलेलं विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

गेल्या शंभर वर्षांत मराठी व्यंगचित्रकारांनी महाराष्ट्राला खळखळून हसवले, कधी डोळ्यात अंजन घातले तर कधी आरसा दाखवला; या संपूर्ण समृद्ध इतिहासाचा दस्तावेज या ग्रंथात बंदिस्त करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या विशेष पुढाकारामुळेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याचे प्रकाशकांनी यावेळी नमूद केले

Raj Thackeray'
ठाण्यात १० टक्के पाणीकपात कायम, पण वार बदलला; कोणकोणत्या भागांत पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.