Viral Love Story : प्रेमाला उपमा नाही... प्रेयसी ७ वर्षे कोमात, प्रियकरानं साता जन्मासारखी वाट बघितली; शुद्धीवर येताच आयुष्यभराची गाठ बांधली

Seven Years Waiting for Girlfriend : सोशल मीडियावर एका भावूक प्रेमकहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अपघातानंतर कोमात गेलेल्या प्रेयसीसाठी प्रियकराने सात वर्षे वाट पाहिल्याचा आणि ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्या भांगेत कुंकू भरल्याचा दावा केला जात आहे.
Viral Love Story Video
Viral Love Story Video
Published On: 

Viral Love Story Video : प्रेमात एकमेकांसाठी जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेणारे अनेक असतात, पण संकटाच्या वादळातही हातातील हात न सोडता शेवटच्या श्वासापर्यंत साथ निभावणारे क्वचितच असतात. अशाच एका निस्सीम प्रेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. एक तरुणी भीषण अपघातानंतर कोमात गेली होती. पण प्रियकराने तब्बल ७ वर्षे तिची वाट पाहिली. त्याने स्वतःच्या प्रेमावरील विश्वास उडू दिला नाही. त्याने तरुणी कोमातून बाहेर आल्यानंतर तिच्यासोबत लग्न केले. तरूणीने खऱ्या प्रेमाची नवी व्याख्याच जगासमोर मांडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची साम टीव्ही पुष्टी करत नाही.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये असा दावा केला जातोय की, एका तरुणीचा भीषण अपघातामुळे अंथरुणाला खिळून होती. ती कोमात गेली होती. पण प्रियकराने तब्बल ७ वर्षे तिची वाट पाहिली अन् प्रेमावरच विश्वास ठेवला. तरुणी कोमातून बाहेर आल्यानंतर प्रियकराने सर्वांसमोर तिच्या कपाळावर कंकू भरून तिला आपलेसे केले. ७ वर्षांची वेदना, तळमळ आणि निस्सीम प्रेम या एका क्षणात व्यक्त झाले. हा भावूक क्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. याची पुष्टी आम्ही करत नाही.

Viral Love Story Video
काँग्रेसच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल, सांगलीचं राजकारण तापलं, नेमकं प्रकरण काय आहे?

नेटिझन्स या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात जिथे नातेसंबंध क्षणात बदलतात, तिथे अशा निस्सीम प्रेमाचा आदर्श अनेकांच्या काळजाला स्पर्शून जात आहे.

Viral Love Story Video
भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा! देशात फक्त एकच जागा मिळाली? कोण आहेत अभिजीत वंजारी, ज्यांनी वाचवली पक्षाची लाज?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोक्यावर लाल स्कार्फ घातलेली मुलगी हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. तिचा प्रियकर तिच्याजवळ येतो आणि तिच्या भांगेत कुंकू भरतो. व्हिडिओमध्ये मुलीच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.