काँग्रेसच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल, सांगलीचं राजकारण तापलं, नेमकं प्रकरण काय आहे?

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान जत सोसायटी गटातील एका मतदाराच्या कथित अपहरणावरून काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Vikram Sawant, Sangli District Bank Election
Vikram Sawant, Sangli District Bank Election
Published On: 

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Vikram Sawant, Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटातील एका मतदाराचे अपहरण झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, यावरून थेट काँग्रेसच्या माजी आमदारावरच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

जत सोसायटी गटातील एका मतदाराला पळवून नेल्याचा आरोप करत उमदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीवरून काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत, पडळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे उमेदवार विनोद पवार आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने जत तालुक्यात मोठा राजकीय खळबळ उडाली आहे.

Vikram Sawant, Sangli District Bank Election
बहिणीच्या निधनाचा धक्का बसला, दुसऱ्या बहिणीनेही ३ मुलांसह विहिरीत उडी मारली, ६ जणांचा मृत्यू

पराभव दिसू लागल्याने खोटे गुन्हे; विक्रम सावंतांचा पलटवार

दरम्यान, आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सावंत म्हणाले, "जिल्हा बँक निवडणुकीत स्वतःचा पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. कोणत्याही मतदाराचे कसलेही अपहरण झालेले नाही. केवळ सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर करून आमच्यावर हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत."

Vikram Sawant, Sangli District Bank Election
भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा! देशात फक्त एकच जागा मिळाली? कोण आहेत अभिजीत वंजारी, ज्यांनी वाचवली पक्षाची लाज?

जिल्हा बँकेच्या ५ जागांसाठी धुरळा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण २१ जागांपैकी १६ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ५ जागांसाठी सध्या तीव्र चढाओढ सुरू आहे. या ५ पैकी जत सोसायटी गटातील निवडणूक भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या प्रतिष्ठेची बनल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.