बहिणीच्या निधनाचा धक्का बसला, दुसऱ्या बहिणीनेही ३ मुलांसह विहिरीत उडी मारली, ६ जणांचा मृत्यू

Shivpuri News Today : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बहिणी आणि चार मुलांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर अंजली रावत हिचा मृत्यू झाल्यानंतर तिची बहीण सीता रावत आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले.
Shivpuri Madhya Pradesh two sisters and four children death
Shivpuri Madhya Pradesh two sisters and four children death
Published On: 

आत्महत्येच्या हादरवून टाकणाऱ्या एका घटनेने मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका बहिणीच्या मृत्यूनंतर बसलेल्या धक्क्यातून आणि नैराश्यातून दुसऱ्या बहिणीने ३ लहान मुलांसह विहिरीत उडी मारून टोकाचे पाऊल उचलले. या भीषण दुर्घटनेत दोन बहिणी आणि चार लहान मुलांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची झाला.

एकमेकींवर खूप प्रेम करणाऱ्या दोन बहिणींनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या भीषण कृत्यात एका गर्भवती महिलेसह तिच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना बुधवारी शिवपुरीच्या गुंगरगाव येथे घडली. ३५ वर्षीय अंजली रावतने कथितरित्या आपल्या तीन मुलींना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर आपल्या ६ वर्षांच्या मुलाला प्रशांतला, घेऊन स्वतःही विहिरीत उडी मारली. सुदैवाने, अंजलीची मोठी मुलगी मोनिका स्वतःला आणि तिच्या दोन लहान बहिणींना वाचवण्यात यशस्वी झाली. ती लगेच घरी धावत गेली आणि तिने आपल्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल सांगितले.

Shivpuri Madhya Pradesh two sisters and four children death
Pune : पुण्यात इंजिनियरिंग शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी अंजली व प्रशांतला विहिरीतून बाहेर काढले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि दोघांचाही मृत्यू झाला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अंजलीचा पती धर्मवीर सिंग रावत याचा दीड महिन्यापूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तीव्र मानसिक तणावाखाली होती.

Shivpuri Madhya Pradesh two sisters and four children death
भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा! देशात फक्त एकच जागा मिळाली? कोण आहेत अभिजीत वंजारी, ज्यांनी वाचवली पक्षाची लाज?

दरम्यान सेसाई गावात घडलेली दुसरी घटना पहिल्या घटनेशी संबंधित असल्याचे स्थानिक सांगत आहेत. अंजलीची ४० वर्षीय बहीण सीता रावत बुधवारी तिच्या तीन मुलांसोबत खोंकर गावातील एका शेतावर गेली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते सर्व परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान कुटुंबाला विहिरीजवळ पाण्याखाली चपला आणि एका मुलाचा मृतदेह सापडला. माहिती मिळताच, पोलिसांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सीता आणि तिच्या तीन मुलांना विहिरीतून बाहेर काढले. पोलिसांनी सांगितले की सीता आठ महिन्यांची गर्भवती होती आणि या दुःखद अपघातात तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला.

दोन्ही बहिणींचे नाते खूप जवळचे होते. त्या दररोज एकमेकींशी फोनवर बोलायच्या. नातेवाईकांचा असा अंदाज आहे की, बहीण अंजलीच्या आत्महत्येमुळे बसलेल्या धक्क्यातून सीतेने हे भयंकर पाऊल उचलले. सध्या पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये पंचनामा केला असून पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com