22-year-old engineering student dies in Pune Kothrud : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुण्याच्या कोथरूड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अभिजित शेट्टी (२२) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पुण्यातील कोथरूड भागातील रहिवासी इमारतीच्या आठव्या मजलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या एका रहिवासी इमारती आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
अभिजित शेट्टी हा मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. मात्र शिक्षणासाठी तो गेल्या २ ते ३ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. सध्या तो पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अभियांत्रिकीच्या ई एन टी सी विभागाच्या तिसऱ्या वर्षाला असताना त्याला काही विषयात एटीकेटी लागल्यामुळे काही दिवसांपासून तो तणावात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शेट्टी राहत असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेट्टीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिकचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.