ठाण्यात १० टक्के पाणीकपात कायम, पण वार बदलला; कोणकोणत्या भागांत पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम? वाचा

Thane Water Cut : ठाणे शहरातील पाणीकपातीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर २०२६ पासून दर सोमवारी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
THANE WATER SUPPLY SHUTDOWN: MIDC ANNOUNCES 24-HOUR WATER CUT IN MUMBRA, DIVA AND KALWA FROM JUNE 18
THANE WATER SUPPLY SHUTDOWN: MIDC ANNOUNCES 24-HOUR WATER CUT IN MUMBRA, DIVA AND KALWA FROM JUNE 18Saam tv
Published On: 

यंदा कमी पाऊस पडण्यामुळे हिवाळ्यातच पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. ठाण्यामध्ये मागील काही दिवसांपासून प्रत्येक बुधवारी पाणीकपात करण्यात येत होती. पण आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक सोमवारी ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात पाणीकपात करण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

अल्-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. यापूर्वी ही पाणीकपात प्रत्येक बुधवारी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता या नियोजनात बदल करण्यात आला असून, बुधवारऐवजी दिनांक 02/11/2026 पासून प्रत्येक सोमवारी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. यांच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनात हा बदल करण्यात आला आहे.

याबाबत दिनांक 28/10/2026 रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात स्टेम वॉटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, ठामपाचे व स्टेम प्राधिकरणाचे अधिकारी यांचे समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत दर महिन्याच्या बुधवार ऐवजी प्रत्येक सोमवारी शटडाऊन घेवून पाणी कपात करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.

THANE WATER SUPPLY SHUTDOWN: MIDC ANNOUNCES 24-HOUR WATER CUT IN MUMBRA, DIVA AND KALWA FROM JUNE 18
बहिणीच्या निधनाचा धक्का बसला, दुसऱ्या बहिणीनेही ३ मुलांसह विहिरीत उडी मारली, ६ जणांचा मृत्यू

राज्य शासनाने अल्-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग करणे आणि पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

THANE WATER SUPPLY SHUTDOWN: MIDC ANNOUNCES 24-HOUR WATER CUT IN MUMBRA, DIVA AND KALWA FROM JUNE 18
काँग्रेसच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल, सांगलीचं राजकारण तापलं, नेमकं प्रकरण काय आहे?

यापूर्वी बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले होते; मात्र दिनांक 02/11/2026 पासून प्रत्येक सोमवारी पाणीकपात होणार असून नागरिकांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. प्रत्येक सोमवारी करण्यात येणाऱ्या पाणीकपातीचा परिणाम घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.