मोदींची मोठी घोषणा! देशातून नक्षलवाद संपला; काँग्रेसला ही सुनावलं

PM Narendra Modi Speech On Naxalism In Gadchiroli: गडचिरोलीतील जनजातीय गौरव दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून नक्षलवाद संपल्याचा दावा केला. नक्षलवादावरून काँग्रेसवर टीका करत आदिवासी विकासाच्या योजनांची माहिती दिली.
PM Narendra Modi speech on Naxalism
PM Narendra Modi speech on Naxalismsaam tv
Published On: 

गडचिरोली: जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नक्षलवाद आणि मओवाद संपल्याचा दावा केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या उलगुलानपासून प्रेरणा घेत देशाने नक्षलवादाचे कंबरडे मोडले असून, आता आदिवासी भागांमध्ये विकासाची गंगा वाहत असल्याचे मोदी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर ही निशाणा साधला. गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेश, मिझोरम, महाराष्ट्रासह देशातील विविध आदिवासी भागांमध्ये विकासकामांचे लोकार्पण झाल्याची माहिती दिली. तसेच भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करत जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

PM Narendra Modi speech on Naxalism
Maharashtra Politics: ​2029 मध्ये तटकरे कुटुंबाला दणका? गोगावलेंच्या वक्तव्याने रायगडच्या राजकारणात खळबळ

125 जिल्ह्यांमध्ये पसरला होता नक्षलवाद

देशातील 125 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी आपले हातपाय पसरले होते. आदिवासी समाज नक्षलवादामुळे संकटात असताना तत्कालीन सरकारे मौन बाळगून होती, अशी टीका मोदी यांनी कॉँग्रेसवर केली. नक्षलवाद आणि माओवादाचे कंबरडे मोडण्यात सरकारला यश आले असून, हे स्वातंत्र्यानंतरचे मोठे यश असल्याचे ते म्हणाले.

PM Narendra Modi speech on Naxalism
Solapur : पंढरपूरमध्ये दुर्दैवी घटना! विहिरीचा कठडा कोसळून ४ मजुरांचा मृत्यू

नक्षलवादामुळे गसचिरोलीसह अनेक आदिवासीबहुल जिल्हयानचे मोठे नुकसान झाले. अल्पवयीन मुलांना नक्षलवादी चळवळीत ओढले जात होते. मात्र, आता नक्षलवाद संपुष्टात आल्याने आदिवासी माता-भगिनींकडून आशीर्वाद मिळत असल्याचे मोदी म्हणाले. यंदा बस्तरमध्ये दिवाळी साजरी केली, ही देशातील आदिवासी भागांसाठी नव्या सुरुवातीची नांदी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

PM Narendra Modi speech on Naxalism
Rupali Chakankar : माझे नाव, फोटो किंवा ओळख वापराल तर खबरदार! रुपाली चाकणकर यांचा कडक इशारा

गेल्या 12 वर्षांत आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकारने प्रभावी योजना राबवल्या आहेत. देशात 4 कोटी पक्की घरे बांधण्यात आली असून, आदिवासींचे उत्पन्न वाढवण्यासाठीही विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे आदिवासी समाजासाठी प्रगतीची दारे खुली झाल्याचे मोदी यांनी सांगितले. पूर्वी महत्त्वाचे दिवस परकीय व्यक्तींच्या नावाने साजरे केले जात होते. मात्र, आता देशातील महापुरुष आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची आठवण करून देणारे दिवस साजरे होत आहेत. भगवान बिरसा मुंडा यांचे उलगुलान आजही आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

50 कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आल्याचा दावा

जागतिक बँकेच्या अहवालाचा दाखला देत पंतप्रधान मोदी यांनी देशातील 50 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आल्याचा दावा केला. हे देशाचे मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम, राज्याचे आदिवासी विकास मंत्री, जिल्ह्यातील आमदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.