Solapur : पंढरपूरमध्ये दुर्दैवी घटना! विहिरीचा कठडा कोसळून ४ मजुरांचा मृत्यू

Maharashtra Solapur Pandharpur News : सोलापूर जिल्ह्यातील आंबे गावात विहीर खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना घडली. विहिरीचा कठडा कोसळल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला.
Solapur Pandharpur News
Solapur Pandharpur News AI Image
Published On: 
Summary
  • पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना घडली.

  • शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात नवीन विहिरीचे काम सुरू होते.

  • काम सुरू असताना अचानक विहिरीचा कठडा कोसळला.

  • मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भरत नागणे, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. विहिरीचा कठडा अचानक कोसळल्याने त्याखाली दबून चार मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आंबे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावातील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम सुरू होते. यासाठी काही मजूर विहिरीत उतरून काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक विहिरीचा कठडा कोसळला. त्यामुळे विहिरीत काम करणाऱ्या मजुरांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. काही क्षणांतच ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

Solapur Pandharpur News
Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ही घटना समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा कोसळल्याने बचावकार्यात अडचणी आल्या. या दुर्घटनेत चारही मजुरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे, तसेच तानाजी घोडके आणि आबा घोडके यांचा मृत्यू झाला आहे. चार मजुरांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Solapur Pandharpur News
Rupali Chakankar : माझे नाव, फोटो किंवा ओळख वापराल तर खबरदार! रुपाली चाकणकर यांचा कडक इशारा

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, विहिरीचे काम सुरू असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चार मजुरांच्या अचानक झालेल्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.