

रायगडमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वाद उफाळला आहे. रायगडमधील या दोन्ही पक्षातील राजकीय वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना शिंदेसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यासह इतर नेत्यांकडून टार्गेट केले जात आहे. आता भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सुनील तटकरेंना इशारा दिला. '२०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाला दणका देणार', असे सूचक विधान त्यांनी केले.
मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी दावा केला की, 'रायगडमध्ये या पुढे शिवसेना ठरवेल तोच खासदार होईल. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे जो उमेदवार देतील तो इथे निवडणूक लढवेल. महाडमध्ये यांनी प्रवेश केला तर चालतो आणि आम्ही श्रीवर्धनमध्ये प्रवेश घेतला की चालत नाही?' २०२९ मध्ये श्रीवर्धन विधानसभा आणि रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असेल.' विकास गोगावले यांच्या दाव्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले आहे.
शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. 'सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादीत कोणी विचारत नाही.', असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला. ते म्हणाले. 'सुनील तटकरे हे येत्या दोन चार दिवसात वेगळा निर्णय घेतील. कारण त्यांना आता राष्ट्रवादीत कोणी विचारेना झालंय. अजित पवार जाऊन ९ महिने झाले त्यानंतर आता सुनील तटकरेंना असे वक्तव्य करण्याची उपरोक्ती सुचली असून त्यांनी असे वक्तव्य करणे उचित नाही.
तसंच, 'सुनील तटकरेंचा राजकीय प्रवास बघितला तर अद्याप त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे केलेलं नाही. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला मात्र येणाऱ्या काळात जनता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवेल. श्रीवर्धन मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तटकरेंनी त्याला हायजॅक केलं होत मात्र यापुढे हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार.' असं आवाहन महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.