

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आलीये. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात होता. तर आता पुन्हा एकदा एका फोटोमुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल होतोय. या फोटोवर 'वेट अँड वॉच 3.0' असा मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3.0' राबवलं जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. दुसरीकडे महायुतीला मात्र मोठा फटका बसला होता. महायुतीमधील अनेक मोठ्या नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते.
दरम्यान निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या वाढली आहे. आता राज्यातील महायुतीमध्ये सर्वाधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत.
पण आता एकनाथ शिंदे यांचा 'वेट अँड वॉच 3.0' असा मजकूर असलेला फोटो पुन्हा चर्चेत आला आहे. या फोटोमुळे शिंदे पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3' राबवणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.