उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खासगी सचिवाकडून महिला तालुका प्रमुखाला मारहाण; शिवसेनेत खळबळ

DCM Private Secretary Accused of Assaulting Woman: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्यावर महिला शिवसेना पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप केलाय. नांदेडच्या देगलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Eknaath Shinde's Private Secretary Faces Assault Allegations In Nanded
Eknaath Shinde's Private Secretary Faces Assault Allegations In Nanded
Published On: 
Summary
  • शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्यावर गंभीर आरोप

  • शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुखांची पोलीसात तक्रार

  • या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्यावर एका महिला पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केलेत. खासगी सचिव पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आलीय. शिवसेना महिला तालुका प्रमुख मिराबाई गंगाधर तमलूरकर यांनी ही तक्रार दाखल केलीय. यास घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडालीय.

Eknaath Shinde's Private Secretary Faces Assault Allegations In Nanded
अजितदादा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार नाही? छगन भुजबळांनी सांगितला राजकीय तिढा

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील खानापूर येथील लक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालयात ७ नोव्हेंबरला शिवसेनेच्या वतीने गरीब नागरिकांसाठी शिधावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात खतगावकर तसेच तमलूरकर याही उपस्थित होत्या. या कार्यक्रमात मिराबाई तमलूरकर यांना बालाजी पाटील खतगावकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. केस ओढून मारहाण केली. इतकेच नाहीतर पती बचावासाठी पुढे आले असता त्यांनाही मारहाण केली असा, अशी तक्रार महिला पदाधिकाऱ्याने केलीय.

Eknaath Shinde's Private Secretary Faces Assault Allegations In Nanded
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी दिल्लीत मोर्चेबांधणी? सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये 35 मिनिटे चर्चा

व्यंकट पाटील खतगावकर, उमेश मुंडे आणि डॉ. व्यंकट धुमाळे यांनीही जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा आरोप तक्रारीत केलाय. या घटनेवेळी उमाकांत पाटील, सायलू गायकवाड, राजेंद्र गोपड आणि साहेबराव नटकर यांनी मध्यस्थी करून आपली सुटका केल्याचेही तक्रारीत नमूद केलंय. उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांवरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने या तक्रारीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. आता या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करणार, असा सवाल विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.