अजितदादा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार नाही? छगन भुजबळांनी सांगितला राजकीय तिढा

Chhagan Bhujbal On NCP Merger : अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणात नेमका कोणता पेच आहे? भाजप आणि काँग्रेससोबतच्या राजकीय समीकरणांमुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी काय सांगितले हे जाणून घ्या.
Chhagan Bhujbal explains the biggest obstacle to NCP merger
Chhagan Bhujbal explains the biggest obstacle to NCP merger
Published On: 
Summary
  • अजित पवार आणि शरद पवार गटांच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात

  • दोन्ही गटांतील काही आमदार एकत्र येण्यास आग्रही

  • अजित पवार गट सध्या भाजपसोबत महायुतीत सहभागी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होतेय. दोन्ही गटातील काही आमदार एकत्र येण्यास आग्रही आहेत. परंतु विलीनीकरणाच्या विषयाला अनेक कंगोरे आहेत. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष भाजपसोबत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष काँग्रेससोबत आहे. यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील त्यांच्या सध्याच्या स्थितीचं काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत आणखी एक मोठा राजकीय पेच आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र का येऊ शकणार नाही, विलीनीकरणातील पेच काय हे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलाय.

Chhagan Bhujbal explains the biggest obstacle to NCP merger
Political News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या घडामोडींना वेग; महत्त्वाचे नेते दिल्लीत, तर पुण्यात आमदारांची बैठक

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणयाची चर्चांनी जोर धरला असतानाच खासदार सुनील तटकरेंनी विलीनीकरणाबाबत मोठं विधान केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे विलीनीकरणाचा कोणताच विषय आला नाहीये. शरद पवार यांची तब्येत बिघाडली होती, त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. विलीनीकरणाबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील असं तटकरे म्हणालेत. दुसरीकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांनी विलीनीकरणात येणार पेच काय आहे किंवा एकत्र येण्याबाबतची अडचण काय यावर भाष्य केलंय.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर भाष्य केलं. आम्ही ज्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, त्यांना विचारात घेतल्याशिवाय पुढील पाऊल टाकता येणार नाही, असं भुजबळ यावेळी म्हणालेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बारामतीत झालेली बैठक कृषी प्रदर्शनाशी संबंधित होती. शरद पवार यांचे चार ते पाच सहकारी तेथे उपस्थित होते. या संदर्भात चर्चा झाल्याचे अजितदादांनी सांगितले होतं. कदाचित याआधी झालेल्या चर्चेच्या वेळी अजितदादांनी पुढील पाऊल उचलले असते, ही शक्यता नाकारता येत नाही. पण या केवळ चर्चा होत्या. अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली, असल्याचं भुजबळ म्हणालेत.

विलीनीकरण भाजपला विचारून करावे लागले - भुजबळ

आता या विषयात भाजपला दूर ठेवून आम्ही काही करू, असे कसे होईल, यात भाजपची संमती घ्यावी लागेल, असं भुजबळ म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर केलेल्या भाष्याचा दाखला देत या सगळ्यांचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले पाहिजे, ही सर्वांची भावना आहे. परंतु, प्रत्येक व्यक्ती आणि पक्षाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने हे कसे जमवायचे, हाच मोठा प्रश्न असल्याचं भुजबळ म्हणालेत.

Chhagan Bhujbal explains the biggest obstacle to NCP merger
NCP Split : आता दादांची राष्ट्रवादी फुटणार? 20-22 आमदार बाहेर पडणार, खासदाराचा मोठा दावा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा खेळ सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरूय. हा खेळ दोन्ही बाजूंनी सांघिकरीत्या खेळला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गटातील) मंडळी एनडीए आघाडीत येणार की, आम्ही सगळे इंडिया आघाडीत जाणार, याचा बोध झालेला नाही. उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांनी आधीच योग्य वेळ येईल, तेव्हा सगळे कळेल, असे म्हटलंय. ताई आम्हाला विश्वासात घेऊन सांगतील, असेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.