Union Cabinet Expansion: काही मंत्र्यांना डच्चू, मित्रपक्षांना संधी? केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत, राजकीय घडामोडींना वेग

Union Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना दिल्लीत वेग आला आहे. काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची, तर एनडीएतील मित्रपक्षांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या हालचालींना वेग आलाय. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार खलबतं सुरू असून बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. त्याचदरम्यान मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांची धाकधुक वाढवलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारासाठी सुरू असलेल्या चर्चांमधून अनेक मंत्र्यांची उचलबांगडी होणार असल्याचं सांगितलं जातंय. तर एनडीएमधील मित्रपक्षांना मंत्रिपदे दिले जातील अशी माहिती समोर आलीय.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली असून यात कोणत्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येईल. मित्रपक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात येईल याची चर्चा झाली. यासह जे पक्ष एनडीएसोबत येणार आहेत, त्यांनाही मंत्रिपद दिली जातील अशी चर्चा सुरूय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.