Maharashtra Politics: एक-दोन दिवसांत विलिनीकरणाचा विषय संपेल, ठाकरेंच्या नेत्याचं मोठं विधान

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा दंतकथा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी एप्रिल-मेपर्यंत देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याचा दावाही केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssaam tv
Published On: 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा ही एक दंतकथा आहे. एक-दोन दिवसांत हा विषय संपेल, असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अमित शाह यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विलीनीकरणासह महिला पत्रकाराच्या भारतातील प्रवेशबंदी आणि राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर 3? उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार?

NCP विलीनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊत काय म्हणाले?

दोन्ही बाजूंना काही लोक आहेत. एका बाजूचे लोक सत्तेला चिकटून राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्या बाजूचे लोक सत्तेत जाण्यासाठी धडपड करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, काल विलीनीकरणाबाबत कोणतीही बैठक झाली नाही. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेटही झालेली नाही, असा दावा त्यांनी केला. संसदीय कार्यसमितीच्या बैठकीत हे सर्वजण असतात. ही बैठक सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालते. मग या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा होणं शक्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या सगळ्या चर्चांबाबत पत्रकारितेचं कौतुक वाटतं, असंही ते म्हणाले. विलीनीकरणाची चर्चा ही एक दंतकथा आहे. एक-दोन दिवसांत हा विषय संपेल, असं मी खात्रीने सांगतो, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अमित शाह यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांचा अमित शाह यांच्याशी जास्त संवाद आहे. तुमच्या सलीम-जावेदच्या स्टोरी सुरू आहेत, असा टोला त्यांनी लगावला. विलीनीकरणाबाबतचा संभ्रम भाजपकडून आणि समोरच्या पक्षाकडून पसरवला जात असल्याचंही राऊत म्हणाले.

महिला पत्रकाराच्या भारतातील प्रवेशबंदीवरून मोदींवर टीका

एका महिला पत्रकाराला भारतात येण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. संबंधित महिला पत्रकाराने मोदींना प्रश्न विचारला होता. त्याच रागातून तिला भारतात येण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला.

Maharashtra Politics
Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

५६ इंच छाती असणारे मोदी एका महिला पत्रकाराला घाबरतात. मोदी डरपोक नंबर एक आहेत. ती महिला पत्रकार भारतात आली असती, तर इतर पत्रकारांना भेटली असती आणि बातम्या झाल्या असत्या, असंही ते म्हणाले.

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं सांगितलं जातं, मग त्या महिला पत्रकाराला भारतात येण्यापासून का रोखलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्या महिला पत्रकाराने नॉर्वे आणि दिल्लीतही घाम फोडला होता, असं राऊत म्हणाले.

राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर भाष्य

राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी या देशात कोणाचे फोन टॅप केले जात नाहीत, असा सवाल केला. राऊत म्हणाले की, राष्ट्रपती, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि लष्करी अधिकाऱ्यांचेही फोन टॅप होत असतील. हुकूमशहा अशाच पद्धतीने राज्य करतात. सरकारमध्ये अस्वस्थता आहे. सरकारला बोरिया-बिस्तरा बांधण्याची परिस्थिती आली आहे. आता त्यांना जावं लागेल.

Maharashtra Politics
Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

एप्रिल-मेपर्यंत मोठ्या घडामोडी होतील- राऊत

आगामी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. यासाठी वेगवेगळे आधार आहेत. दिल्लीत जे आकलन करतो, त्या आधारावर हे सांगत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.