Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

Excess Protein Intake: शरीराला रोज किती प्रोटीनची गरज असते? गरजेपेक्षा जास्त प्रोटीन पावडर घेतल्याने कोलेस्ट्रॉल, हृदय आणि किडनीवर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला, प्रोटीनचे योग्य प्रमाण आणि आहारातून प्रोटीन मिळवण्याचे नैसर्गिक पर्याय.
Protein Supplements
Protein Supplementssaam tv
Published On: 

आजकाल अनेकजण फिट राहण्यासाठी आणि शरीर मजबूत करण्यासाठी प्रोटीन डाएट घेतात. डॉक्टरही शरीराच्या वजनानुसार रोज योग्य प्रमाणात प्रोटीन घेण्याचा सल्ला देतात. मात्र, काही लोक गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेतात. एवढंच नाही तर प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी प्रोटीन पावडर आणि सप्लीमेंटचाही वापर करतात. पण जास्त प्रमाणात प्रोटीन सप्लीमेंट घेतल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतं का? याचा हृदयावर आणि किडनीवर काय परिणाम होतो? तसंच कोणत्या लोकांनी प्रोटीन घेताना जास्त काळजी घ्यायला हवी? हे पाहूयात.

रोज किती प्रोटीन घेणं गरजेचं?

मेदांता मूलचंद हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रोफेसर डॉ. तरुण कुमार यांनी सांगितलं की, WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका व्यक्तीने आपल्या शरीराच्या प्रत्येक किलो वजनामागे साधारण ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीन रोज घ्यायला हवं. जसं की, एखाद्या व्यक्तीचं वजन ६० किलो असेल तर त्याला दिवसाला साधारण ४८ ते ६० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. पण काही लोक यापेक्षा जास्त प्रोटीन घेतात. व्यायाम करणारे आणि शरीर कमावण्याची इच्छा असणारे लोक प्रोटीन सप्लीमेंटचा वापर करतात.

Protein Supplements
Morning joint stiffness: सकाळच्या वेळी हात-पाय आखडतात का? अजिबात करू नका दुर्लक्ष, हा असू शकतो भयंकर आजाराचा इशारा

जास्त प्रोटीन घेतल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

डॉ. तरुण कुमार यांच्या मते, योग्य प्रमाणात प्रोटीन घेतल्यास ते बहुतेक निरोगी प्रौढ व्यक्तींसाठी सुरक्षित असतं. पण गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेणं किंवा विनाकारण प्रोटीन सप्लीमेंटचा वापर करणं काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतं.

एखादी सामान्य व्यक्ती गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेत असेल तर तिला पोट फुगणं, गॅस होणं, पोटात कळ येणं, मळमळणं किंवा जुलाब होण्यासारखे त्रास होऊ शकतात. काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुमंही येऊ शकतात.

जास्त प्रोटीनमुळे किडनीवर ताण येऊ शकतो का?

आपल्या शरीरातील किडनी रक्तातील घाण आणि नको असलेले घटक गाळण्याचं काम करते. प्रोटीनचं प्रमाण खूप वाढल्यास किडनीवर गाळण्याचं काम जास्त पडू शकतं. खास करून ज्यांना आधीपासूनच किडनीचा आजार आहे, त्यांनी प्रोटीन किती घ्यायचं हे स्वतः ठरवू नये. डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच प्रोटीनचं प्रमाण ठरवावं. कारण अशा लोकांनी जास्त प्रोटीन घेतल्यास किडनीचा आजार वाढण्याचा धोका असतो.

Protein Supplements
Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही तास अगोदर त्वचा देते संकेत; चेहऱ्यावर दिसणारे हे 5 बदल ओळखा

प्रोटीन सप्लीमेंटचा हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

बहुतेक लोकांमध्ये प्रोटीन सप्लीमेंटमुळे थेट हृदयाच्या समस्या होतात, असं नाही. पण प्रोटीन सप्लीमेंट घेताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये किती कॅलरीज आहेत, त्या उत्पादनात कोणते पोषक घटक आहेत आणि त्या व्यक्तीला खरंच प्रोटीन सप्लीमेंटची गरज आहे का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

जर रोजच्या जेवणातून शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत असेल, तर त्यापेक्षा जास्त प्रोटीन सप्लीमेंट घेऊन विशेष फायदा होत नाही. त्यामुळे गरज नसताना प्रोटीन पावडर घेणं टाळावं.

प्रोटीनसाठी आहारात कोणते पदार्थ खावेत?

प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी फक्त प्रोटीन पावडरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. रोजच्या जेवणातूनही शरीराला पुरेसं प्रोटीन मिळू शकतं, असं डॉ. तरुण कुमार सांगतात. यासाठी आहारात डाळी, सुकामेवा आणि दूध-दह्यासारखे दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. मांसाहार करणारे लोक अंडी आणि मांसाचाही आहारात समावेश करू शकतात.

Protein Supplements
High Cholesterol: त्वचेवर हे 5 बदल दिसले तर समजा हार्ट अटॅकचा धोका हळूहळू वाढतोय, कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं समजून घ्या

शरीराला किती प्रोटीनची गरज आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. केवळ जास्त प्रोटीन घेतल्याने शरीराला जास्त फायदा होतो, असं नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थांमधून प्रोटीन घेणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.