Morning joint stiffness: सकाळच्या वेळी हात-पाय आखडतात का? अजिबात करू नका दुर्लक्ष, हा असू शकतो भयंकर आजाराचा इशारा

Joint swelling symptoms: सकाळी उठल्यानंतर हात-पाय आखडणे, गुडघेदुखी आणि सांध्यांना सूज येणे ही आर्थरायटिसची संभाव्य लक्षणे असू शकतात. रूमेटाइड आर्थरायटिस आणि ऑस्टिओआर्थरायटिसमधील फरक, सुरुवातीचे संकेत आणि सांधेदुखी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया.
Morning joint stiffness
Morning joint stiffnesssaam tv
Published On: 

सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाला फ्रेश वाटावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अनेकदा अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर हात-पाय आखडल्यासारखे वाटतात. बोटांची हालचाल करताना त्रास होतो, गुडघे दुखतात किंवा सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. अनेकदा आपण या त्रासाकडे वाढतं वय, थकवा किंवा शरीरातील इतर काही समस्या म्हणून पाहतो. पण हा त्रास वारंवार होत असेल आणि बराच वेळ टिकत असेल तर तो आर्थरायटिस म्हणजेच संधिवाताचा सुरुवातीचा इशारा असू शकतो. त्यामुळे शरीर देत असलेले हे संकेत वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. एच. एस. छाब्रा यांनी आर्थरायटिसची लक्षणं, त्याचे प्रकार आणि हा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिलीये.

Morning joint stiffness
Blood vessel health: प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात? या 5 ड्रिंक्सने लगेच वितळेल चरबी

आर्थरायटिसचे प्रमुख प्रकार कोणते?

डॉ. एच. एस. छाब्रा यांच्या मते, आर्थरायटिसचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी रूमेटाइड आर्थरायटिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस हे दोन प्रमुख प्रकार आहेत.

रूमेटाइड आर्थरायटिस

या प्रकारात शरीराची रोगांशी लढणारी यंत्रणा चुकून स्वतःच्याच सांध्यांवर परिणाम करते. त्यामुळे सांध्यांमध्ये सूज येते, वेदना होतात आणि हात-पाय आखडतात सकाळी झोपेतून उठल्यानंतर जाणवणारा साधारणपणे ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहू शकते.

ऑस्टिओआर्थरायटिस

या प्रकारात हाडांच्या सांध्यांमध्ये असलेला गादीसारखा मऊ भाग म्हणजेच कार्टिलेज हळूहळू झिजू लागतो. त्यामुळे चालताना, जिने चढताना किंवा एखादी वस्तू उचलताना सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात. याशिवाय सांध्यांना सूज येणं, सांध्यांचा भाग गरम होणं, लालसरपणा दिसणं, हाताच्या बोटांनी वस्तू पकडताना ताकद कमी होणं आणि गुडघे दुखणं अशी लक्षणंही दिसू शकतात.

Morning joint stiffness
Juice For Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील 3 ज्यूस; रोज पिण्याची सवय लावाच

आर्थरायटिसची कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नयेत?

डॉक्टरांच्या मते, सकाळी उठल्यानंतर हात-पाय किंवा इतर सांधे बराच वेळ आखडून राहणं हे महत्त्वाचं लक्षण आहे. त्याचबरोबर सांध्यांना सूज येणं, लालसरपणा दिसणं आणि चालताना किंवा हालचाल करताना त्रास होणं या समस्यांकडेही दुर्लक्ष करू नये. असा त्रास काही दिवस सतत जाणवत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे त्रास वाढू शकतो.

आर्थरायटिसचा त्रास नियंत्रणात कसा ठेवायचा?

डॉक्टर सांगतात की, हात-पाय आखडणं किंवा सांधेदुखीचा त्रास सतत होत असेल किंवा हळूहळू वाढत असेल, तर त्याला साधा अंगदुखीचा त्रास समजून दुर्लक्ष करू नका. वेळेत डॉक्टरांना दाखवून आवश्यक त्या तपासण्या करून घेणं महत्त्वाचं आहे.

यासोबतच काही गोष्टींची काळजी घेतल्यास हा त्रास नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते

  • नियमितपणे हलका व्यायाम करा

  • शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा

  • रोजच्या जेवणात संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या

  • सांध्यांवर गरजेपेक्षा जास्त ताण येईल अशा हालचाली टाळा

Morning joint stiffness
High Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय? हे 5 पदार्थ खेचून बाहेर काढतील रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.