Juice For Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील 3 ज्यूस; रोज पिण्याची सवय लावाच

High Cholesterol: वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. दुधी भोपळा, बीट आणि कारल्याच्या ज्यूसचे पोषणमूल्य जाणून घ्या. हे ज्यूस संतुलित आहाराचा भाग कसे ठरू शकतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात.
Juice For Bad Cholesterol
Juice For Bad Cholesterolsaam tv
Published On: 

आजकाल वाढत्या कोलेस्ट्रॉलची समस्या केवळ मोठ्या माणसांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पूर्वी साधारणपणे वयाच्या ४० वर्षांनंतर कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण जास्त होतं. पण आता लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतोय. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. भारतातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी अशा तीन ज्यूसबद्दल माहिती दिलीये. या ज्यूसचा आहारात समावेश केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते.

Juice For Bad Cholesterol
Cholesterol Control: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज प्या या 2 मसाल्यांचं पाणी? साचलेली चरबी झटक्यात वितळेल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्या हे ३ ज्यूस

दुधी भोपळ्याचा ज्यूस

दुधी भोपळा ही आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे. भारतातील जवळपास प्रत्येक घरात या भाजीचा वापर केला जातो. अनेकांना लौकीची भाजी आवडते, तर काही जण सांबारमध्येही तिचा वापर करतात. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लौकीचा जूस पिण्याचा सल्ला दिला जातो. नियमितपणे महिनाभर या ज्यूचे सेवन केल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.

Juice For Bad Cholesterol
High Cholesterol: शरीरात साचलेलं कोलेस्ट्रॉल झटक्यात निघेल बाहेर; फक्त दररोज सकाळी चावून खा हे 1 पाच रूपयांचं हिरवं पान

बीटाचा जूस

बीट ही जमिनीखाली वाढणारी अतिशय पौष्टिक भाजी आहे. अनेक जण बीटाचा वापर सलाडमध्ये करतात. मात्र बीटाचा जूस पिणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. दररोज बीटाचा जूस प्यायल्यास रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकतं. बीटामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॉस्फरस असते. याशिवाय त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि सूज कमी करण्यास मदत करणारे घटकही असतात. त्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

कारल्याचा जूस

कारल्याची चव कडू असल्यामुळे अनेक जण कारलं खाणं टाळतात. पण कारलं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दररोज किमान एक ग्लास कारल्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.

Juice For Bad Cholesterol
Lemon water: सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणासाठी फायदेशीर

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.