Lemon water: सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणासाठी फायदेशीर

Lemon water for weight loss: लिंबू पाणी प्यायल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होते का? रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे, संभाव्य दुष्परिणाम आणि वजन नियंत्रणासाठी आवश्यक सवयी जाणून घ्या. डॉक्टरांनी दिलेला सल्ला, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचं महत्त्व समजून घ्या.
Lemon water
Lemon watersaam tv
Published On: 

वजन कमी करण्यासाठी तुम्हीही रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिता का? अनेकांना वाटतं की, कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होते. पण खरंच लिंबू पाण्यामुळे वजन कमी होतं का? याबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लिंबू पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे अनेक जण सकाळची सुरुवात लिंबू पाणी पिऊन करतात. मात्र लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी थेट कमी होते किंवा वजन वेगाने कमी होतं याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. केवळ लिंबू पाणी पिण्यापेक्षा संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं आणि आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

KIMS हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन विभागातील अटेंडिंग कन्सल्टंट डॉ. अंकिता तेजा नारायण यांनी याबाबत माहिती दिलीये. डॉ. अंकिता यांच्या सांगण्यानुसार, लिंबू पाण्यात कॅलरी कमी असतात. त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेटमधील ज्यूस पिण्याऐवजी साखर न घातलेलं लिंबू पाणी प्यायलात तर शरीरात जाणाऱ्या कॅलरी कमी होऊ शकतात. यामुळे दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

Lemon water
Breast cancer: ग्रामीण भागातील महिलांनो, स्तनात होणारे बदल दुर्लक्षित करू नका! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं जास्त फायदेशीर?

अनेक जण सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून पितात. असं केल्याने शरीरातील चरबी लवकर कमी होते आणि वजन झपाट्याने घटतं असं मानलं जातं. मात्र या दाव्याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही.

शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. यामध्ये वय, शरीरातील स्नायूंचं प्रमाण, शारीरिक हालचाल आणि हार्मोन्सची स्थिती यांचा समावेश होतो. त्यामुळे केवळ रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझममध्ये मोठा बदल होत नाही. परिणामी फक्त लिंबू पाणी पिऊन वेगाने वजन कमी होईल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही.

रोज लिंबू पाणी पिणं सुरक्षित आहे का?

बहुतेक लोकांसाठी मर्यादित प्रमाणात लिंबू पाणी पिणं सुरक्षित असतं. मात्र काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. लिंबामध्ये आम्लाचं प्रमाण असतं. त्यामुळे काही लोकांना लिंबू पाणी प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसंच ज्यांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांची समस्या वाढू शकते.

Lemon water
Overripe bananas: काळी पडलेली केळी फेकून देऊ नका! कॅन्सरवर पेशींवर होतो परिणाम; संशोधनातून काय समोर आलं?

याशिवाय वारंवार आम्लयुक्त पेयं प्यायल्याने इनॅमलला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे लिंबू पाणी मर्यादित प्रमाणात प्यावं. ते प्यायल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

निरोगी पद्धतीने वजन कमी कसं कराल?

वजन कमी करण्यासाठी फक्त एखाद्या पेयावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. त्यासाठी रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. इंटरनल मेडिसिन तज्ज्ञांच्या मते, निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

  • संतुलित आहार घ्या- रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पोषक पदार्थांचा समावेश करा.

  • प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खा- आहारातून शरीराला पुरेसं प्रोटीन आणि फायबर मिळत असल्याची खात्री करा.

  • नियमित व्यायाम करा- दररोज शारीरिक हालचाल होणार आहे, याकडे लक्ष द्या.

  • पुरेशी झोप घ्या- शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.

  • कॅलरीकडे लक्ष द्या- दिवसभरात तुम्ही किती कॅलरी घेत आहात, याचा विचार करा.

Lemon water
Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

जर तुमचं वजन सतत वाढत असेल किंवा प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.