High Cholesterol: शरीरात साचलेलं कोलेस्ट्रॉल झटक्यात निघेल बाहेर; फक्त दररोज सकाळी चावून खा हे 1 पाच रूपयांचं हिरवं पान

Natural Cholesterol Remedies: विड्याच्या पानामध्ये कोणते पोषक घटक आढळतात? कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी विड्याचे पान फायदेशीर आहे का, ते कसे खावे आणि कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या. वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे महत्त्वही समजून घ्या.
High Cholesterol
High Cholesterolsaam tv
Published On: 

चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आता तरुणांमध्येही कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिसून येताना पाहायला मिळतेय. कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, अवघ्या ५ रुपयांना मिळणारं विड्याचं पान कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं?

कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय होतं?

कोलेस्ट्रॉल हा शरीरातील रक्त आणि पेशींमध्ये आढळणारा चरबीसारखा घटक आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. परिणामी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

High Cholesterol
Breast cancer: ग्रामीण भागातील महिलांनो, स्तनात होणारे बदल दुर्लक्षित करू नका! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबतच आहाराकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

कोलेस्ट्रॉलसाठी विड्याचं पान फायदेशीर

भारतात अनेकजण आवडीने विड्याचं पान खातात. मात्र विड्याचं पान केवळ खाण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. या पानामध्ये अनेक पोषक घटक असतात. हे घटक शरीराला विविध आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

विड्याच्या पानामध्ये कोणते पोषक घटक असतात?

विड्याच्या पानामध्ये अल्कलॉइड्स, टॅनिन, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोपेन यांसारखे घटक आढळतात. हे घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात. याशिवाय विड्याच्या पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करण्यासाठीही उपयोगी ठरू शकतात.

High Cholesterol
Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

विड्याचं पान कधी आणि कसं खावं?

विड्याच्या पानाचा फायदा मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने खाणं महत्त्वाचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी विड्याचं पान खाऊ शकता. हे पान साधं खाणं फायदेशीर मानलं जातं.

विड्याच्या पानासोबत तंबाखू किंवा इतर कोणताही पदार्थ मिसळून खाऊ नये. अशा पद्धतीने विड्याचं पान खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

High Cholesterol
Lemon water: सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणासाठी फायदेशीर

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.